ठाकरे गटाला दणका; संजय राऊतांचे निकटवर्तीय अटक

मुंबई, २० जुलै २०२३ : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना अटक करण्यात आली आहे. कोविड घोटाळ्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. डॉ. किशोर बिचुले व सुजित पाटकर हे दोघे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांना कोविड घोटळ्या प्रकरणी ईडीने अटक केली आहे.

कोरोनाच्या काळात मुंबईतील नागरिकांना कोरोनावर उपचार करता यावेत यासाठी जम्बो कोवीड रुग्णालय महाविकास आघाडी सरकारने सुरू केले होते. हे

जम्बो कोविड सेंटर चालविण्यासाठी काही खासगी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली होती. ज्यामध्ये लाईफलाईन नावाची एक कंपनी होती. ही कंपनी सुजित पाटकर यांची असल्याचा ईडीचा आरोप आहे. या कंपनीने कोविड सेंटर चालविण्याचे कंत्राट घेतले होते. या कंपनीने जे डॉक्टर्स पेपरवर दाखविले होते तसेच जी यंत्रणा दाखवली होती ती अस्तित्वातच नव्हती असे ईडीच्या तपासात समोर आले आहे.

डॉ. किशोर बिचुले हे बीकेसी जम्बो कोविड सेंटरचे इन्चार्ज होते. यांच्यावर आरोप असा आहे की, जी डॉक्टर्स किंवा नर्स इथे काम करत नव्हते. त्यांचे बिल्स लाईफलाईन मॅनेजमेंटमार्फत  मुंबई महापालिकेला देण्यात आले. त्यानंतर महापालिकेकडून ती बिल्स देण्यात आली. डॉ. किशोर यांच्याकडून खोटे बिल्स तयार करण्यात आले व ते महापालिकेकडून घेण्यात आले. त्यानंतर आता या दोघांना अटक केली असून आता त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप