‘मी तुला घाबरत नाही काय करायचे ते कर’ – जरांगे पाटील यांची भुजबळांवर एकेरी टीका
जालना, १ डिसेंबर २०२३ : छगन भुजबळ यांनी मला शत्रू मानायला सुरुवात केली.आणि तू जर मला दुश्मन म्हणत असेल तर मी तुला घाबरत नाही मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय राहत नाही. काय करायचं ते कर? असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भुजबळांवर एकेरी उल्लेख करत टीका केली आहे.
आज मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा जालन्यातून जंगी सभा आयोजित केली आहे. ही त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील चौथ्या टप्प्यातील पहिली सभा आहे. जी त्यांच्या होम ग्राउंड म्हणजे जालन्यामध्ये होत आहे. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.
यावेळी जरांगे म्हणाले, मराठा हे ओबीसी आरक्षणामध्ये येतात. त्यांच्या शासकीय नोंदी सापडले आहेत. मात्र भुजबळ या माणसाने मराठ्यांना आरक्षण न देण्याचा चंग बांधला आहे. या व्यक्तीमुळेच मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही. त्यांना खायची सवय लागली. मात्र फुकटच किती खावं हे त्यांना कळत नाहीये? यांच्या दबावामुळेच सरकारने मराठ्यांच्या कुणबी नोंदी दाबून ठेवल्या आणि मराठ्यांच्या मुलांचं वाटोळ झालं.
भुजबळ यांनी मला शत्रू मानायला सुरुवात केली.आणि तू जर मला दुश्मन म्हणत असेल तर मी तुला घाबरत नाही मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय राहत नाही. काय करायचं ते कर? असं म्हणत जरांगे यांनी पुन्हा एकदा भुजबळांवर एकेरी उल्लेख करत टीका केली आहे.
त्याचबरोबर पुढे बोलताना जरांगे म्हणाले, सर्व काही गुण्यागोविंदाने सुरू असताना जाती जातींमध्ये दंगली भडकवणारा मंत्री तसेच सर्वात वाया गेलेला मंत्र म्हणजे छगन भुजबळ आहे. वय झालेला असताना कायदेशीर पदावर असताना मात्र खालच्या दर्जाचा माणूस भुजबळ असल्याचा. आरोप या वेळी जरांगे यांनी केला त्याने महापुरुषांची जात काढली आहे तर राजदृह करत आहे.