राणे यांची राजकारणातून निवृत्ती घोषणेने उडाली खळबळ
मुंबई, २४ ऑक्टोबर २०२३: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुलगा आमदार नितेश राणे आणि माझी खासदार निलेश राणे हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेत असतात. मात्र आता राणी कुटुंबातील एका सदस्याने राजकारणातील निवृत्ती घेण्याची घोषणा आज ट्विटर वरून जाहीर केली. त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे.
नारायण राणे हे शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमध्ये काही वर्षे काढल्यानंतर तेथे त्यांना योग्य सन्मान न मिळाल्याने स्वतःचा पक्ष काढला. पण या पक्षाला त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील प्रतिसाद मिळाला नाही. २०१४ मध्ये भाजप सत्ता आल्यानंतर नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्याचबरोबर त्यांची दोन्ही पुत्र नितेश राणे आणि निलेश राणे हे देखील राजकारणामुळे सक्रिय झाले. निलेश राणे हे एकदा खासदार झाले तर नितेश राणे विद्यमान आमदार आहेत.
भाजपकडून राणे कुटुंबियांचा वापर हा विशेषता: ठाकरे कुटुंबियांवर करण्यासाठी केला जातो. संजय राऊत यांची रोज सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद होत असताना त्यामध्ये भाजप नेत्यांवर अतिशय खालच्या शब्दांमध्ये टीका केली जात होती. त्याला उत्तर म्हणून नितेश राणे यांची काही महिन्यांपासून रोज सकाळी पत्रकार परिषद सुरू केली. त्यानंतर आता संजय राऊत त्यांच्या सकाळच्या प्रेस कॉन्फरन्स बंद झालेल्या आहेत. एकंदरीतच भाजपने राणे कुटुंबांची उपद्रव मूल्य ओळखून त्यांना राज्यात व केंद्रात स्थान दिलेले आहे. असे असताना माजी खासदार निलेश राणे यांनी आज विजयादशमीच्या मुहूर्तावर राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे आता माझे मन राजकारणामध्ये रमत नसल्याने मी यातून निवृत्ती घेत आहे. कोणावरही राग नाही असे त्यांनी स्पष्टीकरण यामध्ये दिलेले आहे.
नितेश राणे यांचे ट्विट खालील प्रमाणे
नमस्कर,
मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही.
मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे.
मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.
तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा.
जय महाराष्ट्र!