पंतप्रधान मोदी १ ऑगस्ट रोजी पुण्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या घराचे होणार लोकापर्ण
पुणे, २४ जुलै २०२३: महापालिकेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २०१८ मध्ये पाच वेगवेगळ्या भागात पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे. त्यानुसार पुर्ण झालेल्या घराचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी घराचे लोकार्पण होणार आहे. शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात येणार आहेत. त्यावेळी पुणे महापालिका, पिपंरी चिचंवड महापालिका, महामेट्रो आणि पीएमआरडीए यांच्या विविध प्रकल्पाचे भुमिपुजन लोकापर्णचा कार्यक्रम एकत्रित रित्या शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पुणे आणि पिंपरी चिचंवड महापालिकेचे आयुक्त, पीएमआरडीचे अधिकारी यांची बैठक झाली. लोहगाव विमानतळावरून पंतप्रधान नरेद्र मोदी हे हेलिकॉप्टरने सिंचन भवन येथे येणार आहे. शिवाजीनगरचा शासकीय कार्यक्रम हा सर्वसमान्यासाठी खुला असणार आहे असे पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
प्रातिनिधिक स्वरूपात घराच्या चाव्या देणार
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महापालिकेच्या वतीने शहरात आठ हजारहून अधिक सदनिका निर्माण करण्यात येणार आहेत. महापालिका हद्दीत ज्यांचे घर नाही, अशा नागरिकांसाठी या प्रकल्पांमध्ये पालिका हद्दीत ज्यांचे घर नाही. त्यांना या योजनेत घरे देण्यात आली आहेत. वडगाव प्रकल्पातील सदनिकाधारकांना प्रातिनिधिक स्वरूपात घराच्या चाव्या देणार आहेत.
दगडूशेठचे दर्शन घेणार
लोकमान्य टिळक ट्रस्टतर्फे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण केले जाते. यंदा हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. मोदी यांनी हा पुरस्कार स्वीकारला असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात येणार आहेत. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतील, तसेच टिळक स्मारक येथे लोकमान्य टिळक यांना अभिवादन करणार आहेत.