विरोधीपक्षनेते पदावरून रिक्त करा – अजित पवार यांची पक्षाकडे मागणी

मुंबई, २१ जून २०२३: ममता बॅनर्जी, के चंद्रशेखर राव, अरविंद केजरीवाल आदी नेते मंडळी स्वबळावर त्यांच्या राज्यात सत्ता आणत असताना राष्चट्रावदी काँग्रेसला ते का शक्य होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मला विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदातून मुक्त करा, अशी थेट पक्षाकडे केली त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी आक्रमक भाषण करत पक्षाला आता आत्मपरिक्षण करावे लागेल असे म्हटले. ममता बॅनर्जी, के चंद्रशेखर राव, अरविंद केजरीवाल आदी नेते मंडळी स्वबळावर त्यांच्या राज्यात सत्ता आणत असताना राष्चट्रावदी काँग्रेसला ते का शक्य होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी मी स्वत:  जबाबदारी घेण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. संघटनेच्या कामाचा मला अनुभव आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मी ऐनवेळी अनेकांना आमदारकीची उमेदवारी दिली, ते सर्वणज निवून आले. आता मला संघटनेत कोणतही पद द्या त्या पदाला न्याय देण्याचा मी प्रयत्न करेल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.  पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांच्या भाषणाला समोरुन गर्दीतून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी दाखविलेल्या आत्मविश्वासावर अनेकांनी टाळ्या वाजविल्या.

अजित पवार यांची ही मागणी म्हणजे ते आता अप्रत्यक्षरित्या नाहीतर थेटपणे संघटनेची सुत्रे स्वत:कडे घेण्याचा त्यांच्या प्रयत्न असल्याची प्रतिकिया व्यक्त होते आहे. आगामी निवडणुकीत पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून अजितदादांना पुढे यायचे नाही ना, अशी चर्चा त्यांच्या भाषणातनंतर रंगली आहे.