“आता चंद्रकांत पाटील पुण्यातून निवडणूक लढवणार का?”, संजय राऊतांचा खोचक सवाल
मुंबई, ३ मार्च २०२३ ःउद्या कोथरूडमधून चंद्रकांत पाटील निवडणूक लढणार आहेत का हे त्यांना विचारा. कारण पुण्याची हवा बदललीये. चंद्रकांत पाटील अपनी टोपी संभालो. कसबा भाजपाचा बालेकिल्ला राहिला. त्यांना वाटलं तो त्यांचाच बालेकिल्ला आहे. पण तुमचा विजय शिवसेनेच्या मदतीने होतो हे कालच्या निकालानं स्पष्ट झालं. त्या मतदारसंघात शिवसेनेचं मोठं योगदान आह, अशी टिका ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या एका विधानावरून वाद निर्माण झालेला असताना त्यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंगाचा ठराव आणण्यात आला आहे. त्यावर अध्यक्षांनी सर्वपक्षीय समिती नेमली असून त्यातील सदस्यांवरूनही वाद चालू आहे. त्यात आज राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उत्तराच्या रुपात पुन्हा एकदा राजकीय टोलेबाजी विधानसभेत होण्याची शक्यता आहे.
राऊत म्हणाले, ‘‘ कसबा भाजपाचा बालेकिल्ला राहिला. त्यांना वाटलं तो त्यांचाच बालेकिल्ला आहे. पण तुमचा विजय शिवसेनेच्या मदतीने होतो हे कालच्या निकालानं स्पष्ट झालं. त्या मतदारसंघात शिवसेनेचं मोठं योगदान आहे. ४०-५० हजार शिवसेनेची मतं भाजपाला पडत होती. ज्यांना चिन्ह आणि पक्ष दिलंय, त्या गटाकडे शिवसेनेची मतं असती, तर भाजपाचा तिथला उमेदवार जिंकला असता.
कुणावर हल्ला झाला हे मला माहिती नाही, मी काही पाहिलं नाही. अलिकडे अनेकांना अशा धमक्या दिल्या जात आहेत, हल्ले होत आहेत. पण राज्याचे गृहमंत्री या हल्यांना गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. अशा लहान-सहान किरकोळ गोष्टींमध्ये शिवसेना कधी पडत नाही. आता कुणाला सनसनाटी निर्माण करायची असेल, तर काही लोक स्वत: हल्ले करून घेतात अशी माझी माहिती आहे. होऊ शकतं असं. पण जर कुणावर मुंबईत हल्ला झाला असेल आणि तो राजकीय कार्यकर्ता असेल तर पोलिसांनी ती बाब गांभीर्यानं घ्यायला हवी. आमची नावं घेऊन काय होणार
मी सांगलीत प्रवेश केला, तिथून इथपर्यंत लोक रस्त्यावर, सभागृहात, चौकात जे स्वागत मिळालं.. हे शिवसेनेचं स्वागत आहे. लोक वाट पाहात होते. हे उद्धव ठाकरेंचं स्वागत आहे. सांगलीत शिवसेनेचं महत्त्व असताना इतकी वर्षं आम्ही भाजपाला हा भाग जणू आंदण दिला होता. जे काल कसब्यात झालं, तेच २०२४ला सांगलीत आणि मिरजेत होईल. इथे शिवसेना लढेल. जनता आमच्याबरोबर आहे. सांगली-कोल्हापूरचे सर्व जातीधर्माचे लोक आमच्याबरोबर आहेत
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप