राजकीय दबावामुळे निविदा रद्द; पुणेकर खड्ड्यात

पुणे, ७ जानेवारी २०२३ : महापालिकेच्या पथ विभागाच्या रस्ते डांबरीकरण करण्याच्या ६३ कोटीच्या निविदेत दोन माजी सभागृहनेते, दोन आमदार, तीन माजी नगरसेवक यांनी राजकीय दबाब आणला होता. अखेर या निविदेच्या अटी आणि शर्तीमध्ये त्रुटी आणि तफावत असल्याचे कारण देत पालिका प्रशासनाने या निविदा रदद केल्या आहेत.
गेल्या दोन वर्षात समान पाणी पुरवठा योजना, मलःनिसारण वाहिनी, पावसाळी गटारे, विद्युत वाहिनी, मोबाईल केबल यासह आदी कारणांमुळे रस्त्यांवर वारंवार खोदकाम करण्यात आले आहे. त्यानंतर खड्डे सिमेंट काँक्रिट किंवा डांबर टाकून बुजविण्यात आले, पण हे काम व्यवस्थित केले नसल्याने रस्ते खचले आहेत. त्याठिकाणी वारंवार सिमेंट व डांबर टाकल्याने रस्ते समपातळीत नाहीत. २०२३ मध्ये जानेवारी व जून महिन्यात ‘जी २०’ परिषदेमुळे रस्ते सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेने सर्व रस्ते डांबरीकरण करण्यासाठी ५०० कोटी रुपयांचा खर्चाचे अंदाज काढला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात तीन पॅकजेमध्ये ५० किलोमीटरच्या रस्त्यांसाठी १९३ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण केली. . त्यानंतर दुसऱ्या तीन पॅकेजमध्ये १४२ कोटी रुपयाची कामे केली जाणार आहेत. त्यातील दोन पॅकेज प्रत्येकी सुमारे ५३ कोटी रुपयांचे आहेत. तर पॅकेज ३६ कोटीचे आहे. त्यात काही क्षेत्रीय कार्यालयाकडील रस्ते व दोन कलव्हर्टचा समावेश आहे.

यासाठीची प्रक्रिया सुरू असताना दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या व एकूण पॅकेजमधील चौथ्या क्रमांकाच्या ६३ कोटीच्या निविदेसाठी एटीआर कॅन्सटक्शन , एसएमसी इन्फास्टक्चर, निखिल कॅन्सटक्शन , कष्णाई कॅन्सटक्शन या चार ठेकेदारांनी निविदा भरल्या आहेत. त्यात आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावे यासाठी दोन माजी सभागृहनेत्यांमध्ये चढाओढ लागली होती. निविदेतील ३० किलोमीटरच्या आत आवश्यक प्लांट याच्या अटीवरून वाद सुरू होता.

या वादात दोन आमदार आणि तीन माजी नगरसेवकांनीही उडी घेतली होती. या वादाची तक्रार पालकमंत्री चंदकांत पाटील यांच्या कडे करण्यात आली होती. त्यावर कोणी चुकीचे वागत असेल तर कारवाई करा आणि नियमानुसार निविदा मान्य करा असे आदेश पाटील यांनी दिले होते. त्यावर ही निविदा रदद करण्याची मागणी राष्टवादी अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम आणि कॉग्रेसचे शहराध्यक्ष अरविद शिंदे यांनी केली. अखेर या निविदेच्या अटी आणि शर्तीमध्ये त्रुटी आणि तफावत असल्याचे कारण देत पालिका प्रशासनाने या निविदा रदद केल्या आहेत.

…………………………………………….

निविदा पुन्हा काढावी लागणार
या रस्त्याची कामे करण्यासाठी सहा महिन्याची मुदत होती . पण या मुदतीत काम करणे शक्य नाही असा अहवाल सल्लागाराने दिला आहे. त्यामुळे ही निविदा रदद केली आहे. त्यामुळे या कामासाठी पुन्हा नव्याने निविदा काढावी लागणार आहे