रिपब्लिकन पार्टी अल्पसंख्यांक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी अॅड.आयुब शेख यांची निवड
पुणे, ३० सप्टेंबर २०२२: रिपब्लिकन पक्षात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळणारे तसेच अल्पसंख्याक आघडीत महत्वाची जबाबदारी असणारे अॅड.आयुब शेख यांची रिपब्लिकन पार्टी अल्पसंख्याक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लोणावळा येथे झालेल्या राज्य कार्यकारणी च्या बैठकीत घोषणा केली आहे. .त्यांच्या निवडीने संपूर्ण राज्यभर मुस्लिम व अल्पसंख्यांक समाजाची मोठी ताकत वाढणार अशी अपेक्षा व्यक्त होत आहे .त्यांच्या बरोबर ख्वाजा शेख यांची सरचिटणीस पदी निवड करण्यात आली .
शेख हे पुणे महापालिकेत नगरसेवक होते .तसेच मुस्लिम कॉ.ऑपरेटिव्ह बँकेवर संचालक म्हणून पाचव्यांदा ते निवडून आले आहेत.आझम कॅम्पस संस्थेत त्यांनी वीस वर्ष सचिव म्हणून काम पाहिले आहे .शिक्षण क्षेत्रातही त्यांनी भरीव कार्य केले आहे .त्यांच्या पत्नी अॅड. फर्जाना शेख याही पुणे महापालिकेत नगरसेविका होत्या. अॅड.आयुब शेख यांचं पूर्ण महाराष्ट्रभर मुस्लिम समाज आणि अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांचा संपर्क दांडगा आहे . येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्भूमीवर त्यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे .
राज्यातील मुस्लिम व अल्पसंख्यांक समाजाला त्यांच्या अडचणी सोडवून शिक्षण आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणारा असल्याचे अॅड.आयुब शेख यांनी सांगितले आहे .तसेच विविध प्रश्नासाठी माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाने अल्पसंख्यांक समाजाला न्याय देणार असल्याचे त्यांनी सांगितले .