विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून तिसरे नाव पुढे अजित पवारांकडे मोठा पेच

पुणे, १० सप्टेंबर २०२४ : शूज जरा विधान परिषदेच्या १२ जागांसाठी निवडणूक होणार असताना त्यामध्ये तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार आहेत. पुण्यामधून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे नाव समोर आलेले असताना त्यानंतर प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी देखील इच्छुक म्हणून नाव पुढे आलेले आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना देखील विधान परिषदेची उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली असल्याने पुणे शहरातूनच तीन इच्छुकांची नावे समोर आली आहेत त्यामुळे नेमकी उमेदवार कोणाला द्यायची याचा पेच अजित पवार यांच्यासमोर निर्माण झालेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून विधानपरिषदेच्यासाठी विविध नेत्यांचे नाव पुढे येत असताना आज पुणे शहरातील जवळपास शंभरहून अधिक पदाधिकाऱ्यांकडून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेत शहराध्यक्ष दिपक मानकर यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचं विधानपरिषदेच्यासाठी नाव पुढं आल्यानंतर पक्षाच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी थेट एका पदाधिकाऱ्याला एक पद देत मी देखील इच्छुक असल्याचं म्हटल होत.आणि आत्ता शहरातील पदाधिकाऱ्यांनीच शहराध्यक्ष दिपक मानकर यांचं नाव पुढे करत अजित दादांनी शहराध्यक्ष दिपक मानकर यांना संधी द्यावी अशी मागणी केली आहे.

त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, विधान परिषदेचे तीन आमदार निवडण्यासाठी अध्याप पक्षांमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही त्यामुळे त्याबाबत काही सांगता येणार नाही.