अमित शहा यांच्यावर टीका करणे ऐवजी 100 कोटीचे वसुली प्रकरण शरद पवार विसरले का? – मुरलीधर मोहोळ
छत्रपती संभाजीनगर, २७ जुलै २०२४ : “सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलेला माणूस आज देशाचा गृहमंत्री आहे”, अशी टीका शरद पवार यांनी अमित शाह यांच्यावर केली आहे. त्यानंतर शरद पवार यांना उत्तर देण्यासाठी भाजपकडे तगडी फौज असताना देखील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर मैदानात उतरविण्यात आलेले आहे. मोहोळ यांनी उत्तर देताना शहा यांना तडीपार करणे हा मोठा व्यापक कट होता त्यांनी त्यावर निर्देशत्व मिळवून दूध का दूध आणि पाणी का पाणी केले आहे. त्यामुळे त्याचा उल्लेख करण्याचा पवाराने काही कारण नाही असे उत्तर मोहोळ यांनी दिलेले आहे.
अमित शाह यांनी शरद पवार यांचा ‘भ्रष्टाचारी लोकांचे म्होरके’ असा उल्लेख केला होता. शाहांच्या त्या टीकेला शरद पवार यांनी आज चोख प्रत्युत्तर दिलं. “अमित शाह यांना सर्वोच्च न्यायालयाने गुजरातमधून तडीपार केलं होतं आणि आता ते देश चालवतायत”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. “महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराला शरद पवारांनीच संस्थात्मक स्वरूप दिलं”, अशी टीका शाह यांनी केली होती. त्या टीकेवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले, अमित शाह हे आता देशाचे गृहमंत्री आहेत. ते मागे एका भाषणात म्हणाले होते, शरद पवार हे भ्रष्टाचारी लोकांचे सुभेदार आहेत. परंतु, देशाच्या गृहमंत्रिपदावर बसलेल्या या माणसाला सुप्रीम कोर्टाने तडीपार केलं होतं. अमित शाह हे जेव्हा गुजरातमध्ये होते. तेव्हा त्यांनी कायद्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला होता. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखली जावी म्हणून त्यांना गुजरातमधून तडीपार केलं होतं. तो माणूस आता देशाचा गृहमंत्री झाला आहे आणि देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी घेऊन अशी वक्तव्ये करत आहे.
छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले, शरद पवार यांनी उल्लेख केलेलं अमित शाह यांच्या विरोधातील प्रकरण व्यापक राजकीय षड्यंत्राचा भाग होतं. अमितभाईंच्या निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब करून सुप्रीम कोर्टाने ‘दूध का दूध, पानी का पानी’ केलंच. त्यामुळे अमितभाईं विरोधात रचलेल्या या खोट्या राजकीय षड्यंत्राचा पवारसाहेबांनी उल्लेख करायचं काही कारण नव्हतं.
केंद्रीय गृहमंत्र्यांवर बोलण्याऐवजी राज्यात त्यांनीच केलेल्या मविआ काळातील गृहमंत्र्यांनी काय केलं होतं? याचा विचार करून बोलायला हवं होतं. त्यांचेच गृहमंत्री जेलवारी करून आलेत. १०० कोटींच्या खंडणीवसुलीसारखा गंभीर आरोप तुमच्या गृहमंत्र्यांवर आहे, याचं विस्मरण बहुतेक पवार साहेबांना पडलेला दिसतोय.