हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार

इंदापूर, ६ जुलै २०२४ : राज्यात विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीचे तीन घटक पक्ष एकत्र राहू शकतात. पण भाजपचे इंदापुरातील दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील हे आगामी विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत तर नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे. असा प्रश्न निर्माण होण्यामागील किंवा अशी चर्चा सुरु झाली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. राज्यात महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे या पराभवानंतर महायुतीच्या काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडे बोट दाखवण्याचा देखील प्रयत्न केला. यावेळी अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांच्याकडून सडेतोड प्रत्युत्तरही देण्यात आलं. पण विधानसभा निवडणुकीच्या आधी ही युती तशीच अबाधित राहते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्याचं वातावरण पाहता राज्यात विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीचे तीन घटक पक्ष एकत्र राहू शकतात. पण भाजपचे इंदापुरातील दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील हे आगामी विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत तर नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे. असा प्रश्न निर्माण होण्यामागील किंवा अशी चर्चा सुरु झाली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर शहरात एक बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. कारण या बॅनरवर विमानाचा फोटो आहे. तसेच या बॅनरवर लिहिण्यात आलेल्या गोष्टी पाहता इथे आगामी काळात मोठ्या राजकीय उलथापालथीच्या घटना घडू शकतात, याचे संकेत मिळताना दिसत आहेत. इंदापुरात आमचा स्वाभिमान आमचे विमान अशा आशयाचे गुलाल उधळलेले बॅनर झळकवण्यात आले आहेत. आमचं आता ठरले. लागा तयारीला, विधानसभा २०२४ असं या बॅनरमध्ये म्हटलं आहे.

या बॅनरमधला आशय आणि विमानाचं चिन्ह इंदापूरच्या राजकारणात खास आहे. कारण गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यात लढत बघायला मिळाली आहे. गेल्या निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांचा विजय झाला होता. त्याआधी दोन वेळा हर्षवर्धन पाटील हे विमानाच्या चिन्हावर अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील हे आता अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत का? अशी चर्चा आता रंगत आहे.

इंदापूरच्या जागेवर सध्या अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत. या जागेवर हर्षवर्धन पाटील यांचादेखील दावा आहे. दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचं नाव चर्चेत होतं. पण त्यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्या नाराज कार्यकर्त्यांनी अशा प्रकारची बॅनरबाजी केली का? असादेखील प्रश्न आता उपस्थित होतोय. संबंधित बॅनर झळकल्यानंतर आता इंदापुरात काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.