महायुतीबाबत चुकीचा संदेश नको : दरेकर छगन भुजबळ यांना राजकीय सल्ला

मुंबई, २९ मे २०२४ : ‘विधानसभा आहेत, त्यांनी जास्त जागा का मागू निवडणुकीत भाजपने आमच्या पक्षाला जास्त जागा देण्याचा शब्द दिला होता,’ अशा प्रकारची जाहीर वक्तव्ये छग भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने टाळावीत. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीबाबत चुकीचा संदेश जाऊ नये, यासाठी त्यांनी अशी वक्तव्ये करू नयेत, असा सल्ला भाजपचे विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या काल झालेल्य बैठकीत भुजबळ यांनी विधानसभेच्या जागांबाबत विधान केले होते. त्यावर दरेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘पक्ष चालवत असताना कार्यकर्त्यांना हिंमत देणे, मनोबल वाढवणे हेही तितकेच महत्त्वाचे असते.
त्यांना जास्त वाटा मागावासा वाटत असेल, तर मग भाजपचे १०५ आमदार नयेत’, असा सवालही त्यांनी या वेळी केला.

भुजबळ यांना जसे वाटते तसे पक्षाच्या कार्यकर्त्याला, प्रत्येक नेत्याला वाटते. समन्वयातून व संतुलन साधूनच महायुतीत निर्णय होईल. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले आहे की, भाजप हा मोठा पक्ष आहे. त्यामुळे साहजिकच तुलनात्मक जागा मोठ्या प्रमाणावर भाजपला असतील. सहयोगी पक्षांचे कुठेही अवमूल्यन होणार नाही, याची काळजी घेऊन त्यांचाही सन्मान केला जाईल, असेही दरेकर म्हणाले. आमचाही मोठा पक्ष आहे, कार्यकर्ते आहेत, तो नाराज झाला तर पक्षाची गती, वाटचाल यावर परिणाम होतो. असे असताना कुणीही बोलायचे आणि आम्ही गप्प बसायचे, हे चालणारे नाही, असा इशारा त्यांनी दिला.