राज्यात तिसऱ्या टप्प्यात ११ मतदारसंघांसाठी मतदान सुरू
मुंबई, ७ मे २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे. राज्यामध्ये ११ लोकसभा मतदारसंघात मतदान होत असून यामध्ये भाजप महायुतीचे प्रतिष्ठान पणाला लागलेली आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता सकाळी सात वाजल्यापासून सर्वच मतदारसंघात मतदानासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात आठ टप्प्यात मतदान होणार आहे आत्तापर्यंत मतदानाचे दोन टप्पे पूर्ण झाले असून आज तिसऱ्या टप्प्यात देशभरातील 94 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे त्यापैकी आक्रमक मतदारसंघ हे महाराष्ट्रातले असून यामध्ये लातूर, धाराशिव, सोलापूर, माढा, सातारा, सांगली, कोल्हापूर, बारामती, रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड आणि हातकणंगले या मतदारसंघांचा समावेश आहे.
लातूर मतदारसंघांमध्ये भाजपचे सुधाकर शृंगारे विरुद्ध काँग्रेसचे शिवाजीराव कोळगे, धाराशिव मध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अजित पवार गटाच्या अर्चना पाटील, सोलापूर मध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते, माढ्यामध्ये रामराजे निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील, बारामती मध्ये नणंद भावजय मध्ये लढत असून अजित पवार गटाकडून सुनिता पवार विरुद्ध शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे यांच्या मते लढत होत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शशिकांत शिंदे यांचे आव्हान आहे. तर, कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक यांच्यात लढत आहे. हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने यांच्याविरुद्ध राजू शेट्टी यांचे आव्हान आहे, सांगलीमध्ये काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील शिवसेनेचे चंद्रहार पाटील आणि भाजपचे संजय काका पाटील या तिघांमध्ये तिरंगी लढत होत आहे. कोकणातील दोन मतदारसंघांमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत आणि रायगड मध्ये सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते यांच्यात लढत होत आहे.
तिसरा टप्प्यामध्ये मराठवाडा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रीय गणिते गेल्या दोन महिन्यांमध्ये बदलल्यामुळे येथील जागा पुन्हा निवडून आणण्याची आव्हान भाजप पुढे उभे राहिलेले आहे. त्यात मतदार कोणाच्या बाजूने खोल देतात हे पाहणे आवश्यक आहे.