गाडीखाली कुत्र मेले तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेणार का? देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना प्रतिउत्तर

मुंबई, ९ फेब्रवाऱी २०२४ : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या घटनेने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपासाला गती देत दोघा जणांना ताब्यात घेतले. या घटनेवर विरोधकांनी सरकारवर टीका करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या घडामोडींनंतर आता देवेंद्र फडणवीस यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. उद्या एखादं श्वान गाडीखाली आलं तरी राजीनामा मागतील, असे म्हणत फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अभिषेक घोसाळकर प्रकरणात विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले.

अकार्यक्षम, हतबल फडणवीसांना माणूस आणि कुत्र्यामधील फरकही कळेना -नाना पटोले संतापले

घोसाळकर आणि त्यांचा साथीदार मॉरिस नरोव्हा हे दोघे फेसबुक लाईव्ह करत असताना नरूवायाने घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला. फेसबुक लाईव्हमध्ये या गोळीबाराचे चित्रण रेकाॅर्ड झाले, त्यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. याचे राजकीय पडसाद देखील उमटण्यास सुरुवात झाली आहे. घोसाळकर आणि नरोव्हा हे दोघे एकमेकांशी व्यवस्थित गप्पा मारत बसलेले असताना अचानक गोळीबार का झाला याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पण महाराष्ट्रात वारंवार गोळीबाराच्या घटना होत आहेत. यामध्ये शरद मोहोळ ची हत्या, ठाण्यामध्ये भाजपच्या आमदाराने शिंदे गटाच्या शहराध्यक्षावर केलेला गोळीबार यामुळे महाराष्ट्रातील गुन्हेगारी क्षेत्र व राजकीय क्षेत्र ढवळून निघालेले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्री पद असल्याने ते गृहमंत्री पद सांभाळण्यास समर्थ आहेत त्यामुळे त्यांनी या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरे गटाकडून केली जात आहे त्यास आज फडणवीस यांनी उत्तर दिले.