मुरलीधर मोहळ होणार राज्याचे मुख्यमंत्री? चर्चेला उधाण
पुणे, २९ नोव्हेंबर २०२४: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदी नियुक्त होण्याची अन्नपचिकता शिल्लक आहे अशी चर्चा सुरू होती मात्र भाजप नेत्यांकडून अद्यापही सत्ता स्थापने संदर्भात दावा करण्यात आलेला नाही तसेच भाजपचा विधानसभेतील नेता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली नाही मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होतील अशी चर्चा सुरू असताना आता एका तरुण चेहऱ्याची चर्चा सुरू झालेली आहे पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री राज्याचे नवे मुख्यमंत्री होऊ शकतील या चर्चेने जोर धरलेला आहे.
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपला १३२ शिवसेना ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ आमदार निवडून आलेले आहेत. सत्ता स्थापनेसाठी १४३ आमदारांची आवश्यकता आहे. भाजपकडे १३२ आमदार असल्यामुळे फक्त १२ आमदारांची जुळवाजुळ करणे भाजपला अवघड नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांचे उपद्रव मूल्य संपलेले आहे. अजित पवार यांनी यापूर्वीच फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी पाठिंबा दिलेला आहे. तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा त्यांची नव्याने नियुक्ती व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दबाव तंत्र म्हणून महाराष्ट्राला मराठा मुख्यमंत्री मिळावा यासाठी त्यांनी दबाव आणण्यास सुरुवात केलेली आहे.
दिल्लीमध्ये काल झालेल्या महायुतीच्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. केवळ चर्चा झाली, शिंदे नाराज असल्यामुळे आजच्या बैठका रद्द झालेली आहेत. अशातच आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण म्हणून अशी चर्चा सुरू झालेली आहे.
भाजपमधून मुख्यमंत्रीपदासह देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण या नावांसह अचानकपणे पुण्याची खासदार व केंद्रीय सहकार राज्यमंत्री यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे. मुरलीधर मोहळ हे पुण्याचे माजी महापौर आहेत. ते मराठा असून पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडे संघटनेची जबाबदारी होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ५८ पैकी ४६ जागा महायुतीच्या निवड झालेल्या आहेत. यापैकी २८ आमदार हे भाजपचे आहेत मुरलीधर मोहोळ हे मोदी आणि शहा यांचे निकटवर्ती मानले जातात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जुन्या स्वयंसेवकाला संधी मिळावी व मराठा चेहरा म्हणून मुख्यमंत्री देता येईल अशी चर्चा सध्या भाजपच्या राजकीय वर्तूळात सुरू आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियामध्ये देखील मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री होणार असल्याचे चर्चेला उधाण आलेले आहे. दरम्यान या संदर्भात भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी भाजपचा मुख्यमंत्री हा शहा आणि मोदी हे दोघे ठरवणार आहेत. त्यामुळे कोणाच्या नावाची चर्चा आहे सुरू आहे याला फारसे काही महत्व नाही. नेमके मुख्यमंत्री कोणते होणार आहे हे मोदी आणि शहा यांच्याकडूनच करू शकेल. असे सांगत मोहोळ यांच्या नावाला दुसरा दिलेला नाही. पण भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोहोळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे.