शाळा शिकला तर जेलमध्ये का गेला – मनोज जरांगे पाटील यांची भुजबळांवर टिका

हिंगोली, ८ डिसेंबर २०२३: शिकला होता तर तुरुगांत कशाला गेला, माझं शिक्षण नाही तरी मी आरक्षण निर्णयावर आणलं, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे राज्यभर सभा घेत आहेत. हिंगोलीतील डिग्रस फाट्यावर आज जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत बोलताना मनोज जरांगेंनी टीका केली आहे.

आता त्याला सुट्टी नाही, त्याच्या माघं मी आहेचं, या शब्दांत जरांगे पाटलांनी छगन भुजबळांचा पुन्हा एकदा एकेरी उल्लेख केला आहे. तसेच तो जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. गावाखेड्यातील ओबीसी मराठ्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. मला शिक्षण नसून मी आरक्षण निर्णयावर आणलं की नाही, तू जर शिकलेला होतास तर तुरुगांत कशाला गेला, असा सवालही त्यांनी केला आहे.

मराठा आंदोलनात महिला पहिल्यापासून सहभागी आहेत. ज्या ज्या वेळी महिलांनी एखादा विषय मनावर घेतला, त्या त्यावेळी क्रांती झाली. आपल्या लेकरा-बाळांना आरक्षण मिळावं म्हणून अनेक मराठा बांधव, महिला, तरूण अंतरवलीतील आंदोलनात सहभागी झाले होते. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होतं. मात्र, आंदोलकांवर प्राणघातक हल्ला झाला. माता-बहिणींच्या डोक्याच्या चिंधड्या झाल्या. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होता. याशिवया, आमची काय चूक होती? हे निर्दयी सरकार आहे, अशी टीका जरांगेली केली. आता माघार नाही, माझा जीव गेला तरीही मागं हटणार नाही अस जरांगे पाटील म्हणाले.

मराठ्यांवर अन्याय केला तर तुमचं फिरणंही मुश्कील होईल. भुजबळांचं ऐकू नका. तो जातीयवाद करतो. त्याला जातीलय तेढ निर्णाण करायची आहे. तो लोकांचं शिक्षण काढतो. घटनेच्या पदावर बसतो आणि स्वत: कायदा पायदळी तुडवतो. भुजबळ तुम्ही मराठ्यांच्या नादी लागू नका, जड जाईल, असा इशाराही जरांगेंनी दिला.
दरम्यान, डिग्रस फाट्यावर या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही सभा ११० एकरमध्ये घेण्यात आली असून १४० एकरमध्ये सभेसाठी येणाऱ्या नागरिकांच्या गाड्यांची पार्किंग व्यवस्था केली गेली होती.