कोण संजय राऊत ? अजित पवारांचा प्रश्न
पुणे, २१ एप्रिल २०२३ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत बाबींवर भाष्य केल्यानंतर संतापलेले अजित पवार यांनी तुम्ही तुमच्या पक्षाबद्दल बोला मुखपत्रात लिहा आमच्या पक्षात बोलायचे कारण नाही असे बजावले होते त्यानंतर ही संजय राऊत यांची वक्तव्य थांबलेली नाहीत त्यावर आता अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत कोण संजय राऊत असा प्रश्न विचारून त्यांना बेदखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी ची आज सकाळी पुण्यामध्ये पत्रकार परिषद झाली त्यावेळी त्यांनी संवाद साधला दरम्यान
अजित पवार पक्षात बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांना काही दिवसांपूर्वी जोर आला होता. मात्र, माध्यमांसमोर येत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. मी पक्षातून बाहेर जाणार नसून जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. परंतु, त्यांच्या या स्पष्टीकरणानंतरही अजित पवारांच्या भूमिकेवर अनेकांकडून संशय व्यक्त करण्यात येतोय.
संजय राऊतांनी अजित पवारांना दिलेल्या सल्ल्याबद्दल पत्रकार परिषदेत पवार म्हणालेे, “तुम्ही स्पष्टीकरण दिल्यानंतरही संजय राऊत “कोण संजय राऊत?” असा प्रतिसवाल केला. “शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत” असं उत्तर पत्रकारांनी देताच, “मी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं, मग कोणाच्या अंगाला का लागावं?” मी माझ्या आणि पक्षापुरतं बोललो.” असं प्रत्युत्तर पवारांनी दिलं.
संजय राऊत हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात असून महाविकास आघाडीमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या वतीने त्यांनी कायम भाजपवर हल्ला केलेला आहे. मात्र राऊत यांची भाषा या आघाडीतील काही नेत्यांना आवडत नाही. त्यामुळे ते त्यांना स्वतःपासून दूर ठेवतात. अजित पवार प्रकरणात राऊत यांनी घेतलेली भूमिका ही पवारांना पटल्याने त्यांनी त्यांच्यावर टीका.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप