मंत्रिमंडळाचं खातेवाटप कधी होणार? अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला प्रश्न

पुणे दि.१३/८/२०२२: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला पण अजून कसे त्यांना खाते वाटप झालेले नाही? असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

 

“राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकारने त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार तर केला आहे परंतु खातेवाटपाबद्दल विचारणा केली की ‘लवकरचं’ असं त्यांचं नेहेमीचं उत्तर आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधीही विस्ताराबाबत विचारल्यावर हेच त्यांचं उत्तर असायचं त्यामुळे ‘लवकरचं’ हा या सरकारचा आवडता शब्दच झालेला आहे, ” असेही पवार म्हणाले.

 

“प्रत्येक स्वातंत्र्य दिनी जिल्ह्यात पालकमंत्री ध्वजारोहण करतात. यावेळेस मात्र विनापालकमंत्रीच हा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा पार पाडावा लागणार. ह्या सरकारवर लोकं नाराज आहेत. शिवसेनेत फूट पाडून सत्तेत येऊ पाहाणार्यांना पुढे कधीच यश येणार नाही . महाविकास आघाडीने मिळून निवडणूक लढवली तर पुढील चित्र काहीसं वेगळ असेल त्याबद्दल त्या त्या पक्षाचे नेते विचार करतील. तसेच यावेळी अधिवेशनात नागरिकांच्या प्रश्नावंर महाविकास आघाडीने एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि सरकारचे मंत्रीमंडळात खातेवाटप करणे अत्यंत गरजेचे आहे कारण अधिवेशनात मंत्र्यांना त्यांच्या खात्याबाबतीत सही करावी लागते त्यामुळे लवकरात लवकर खातेवाटप झाले पाहिजे,” असे पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.