महाराष्ट्रासाठी आम्ही आहोत असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस कधी बोलणार? सुषमा अंधारे
मुंबई, २ डिसेंबर २०२२ः गुजरातमध्ये निवडणुका आल्या की, आपले उद्योग पळवले. कर्नाटकच्या निवडणुका लागल्या की, त्यांनी महाराष्ट्रातील गावं पळवायला सुरुवात केली. जर अशाच पद्धतीनं सुरु राहीलं तर महाराष्ट्रासाठी आम्ही आहोत असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस कधी बोलणार? असा सवाल शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात आहेत. अशा स्थितीत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणत आहेत की, हे उद्योग माझ्या काळात गेले नाहीत. ते खोटं बोलत असल्याचे अंधारे म्हणाल्या. लाखो बेरोजगारांच्या हातचा घास हिरावून घेण्याचं काम सुरु असल्याचे त्या म्हणाल्या. मुलुंडमध्ये शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेत अंधारे बोलत होत्या.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनांच चॅलेंज करुन शकतात, तशी त्यांची वाटचाल सुरु असल्याचे अंधारे म्हणाल्या. मुलुंडमध्ये शिवसेनेच्या महप्रबोधन यात्रेत त्या बोलत होत्या. भाजपच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत असताना त्यावर फडणवीस काहीही बोलत नसल्याचेही त्या म्हणाल्या.
उद्धव ठाकरे यांना सत्तेतून दूर करण्यासाठी काही कपटी लोकांनी पाठीत खंजीर खुपसला. पण आम्हाला उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पाहायचे असल्याचेही अंधारे म्हणाल्या. काही जण म्हणतात सुषमा अंधारेंकडे आम्ही लक्ष देत नाही, लक्ष देत नाही तर एका दिवसात माझ्यावर पाच पाच कॅबिनेट मंत्र्यांना का बोलावं लागतं? असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला. सध्या महिलांचे प्रश्न ऐरणीवर असताना याबाबत देवेंद्र फडणवीस लक्ष घालत नसल्याचे अंधारे म्हणाल्या. भाजप Ed चा दुरुपयोग करुन एक एक पक्ष संपवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपला शिवसेना नाहीतर सर्वच पक्ष संपवायचे असल्याचे अंधारे म्हणाल्या. गुजरातमध्ये निवडणुका आल्या की, आपले उद्योग पळवले. कर्नाटकच्या निवडणुका लागल्या की त्यांनी महाराष्ट्रातील गाव पळवायला सुरुवात केली. जर अशाच पद्धतीनं सुरु राहीलं तर महाराष्ट्रासाठी आम्ही आहोत असं म्हणणारे फडणवीस कधी बोलणार? असा सवाल अंधारेंनी केला.
सध्या इडी चा दुरुपयोग होत आहे. इडी चा दुरुपयोग करुन इथली लोकशाही धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे अंधारे म्हणाल्या. भाजपने ज्यांच्या ज्यांच्या सोबत हातमिळवणी केली, त्यांचे त्यांचे हात आणि पाय कलम करण्याचा प्रयत्न केल्याचे अंधारे म्हमाले. भाजपला सगळेच पक्ष संपवायचे असल्याचे त्या म्हणाल्या. विरोधी पक्ष संपवले गेले तर हुकूमशाही तयार होईल. या महाराष्ट्राची अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी शिवसेना कायम लढत राहील असेही अंधारे म्हणाल्या. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा आणि सिंधुदुर्ग तोडून गोव्याला नेण्याचा, वेगला विदर्भ करण्याचा घाट काही लोकांनी घातला असल्याचे अंधारे म्हणाल्या.