‘त्यांना आरक्षणातलं काय कळतंय?’, मनोज जरांगेंची राज ठाकरेंवर टीका

जालना, ५ ऑगस्ट २०२४ : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. अशातच मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मोठं विधान केलं. महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही, असं विधान त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याला आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. ज्यांना आरक्षणातलं काही कळत नाही, त्यांच्यावर काय बोलावं? असं वक्तव्य जरांगेंनी केल. याशिवाय राज ठाकरेंना त्यांचे मित्र भडकवत असल्याचा आरोपही जरागेंनी केलाय.

मनोज जरांगेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांना अनेक विषयांवर भाष्य केलं. राज ठाकरेंच्या वक्तव्याविषयी विचारले असता ते म्हणाले, सागर बंगल्यावरील तुमचा मित्र ज्याला तुम्ही रोज भेटता, तो लोकांचे डोके आहे. राज ठाकरेंनाही त्यांचाच मित्र भडकवत आहेत. मराठे फक्त त्याचा हक्क मागत आहेत. सागर बंगल्यावरचा तुमचा मित्राने मराठा समाजाचे नेते विरोधात घातले. तसेच ओबीसी समाजाच्या नेत्यांनाही फुस लावली. त्यामुळं तुम्ही मराठा समाजाला दोष देण्याचं काम करू नका, असा जरांगे म्हणाले. ज्यांना आरक्षणातलं काही कळतच नाही. त्यांच्यावर आम्ही काही बोलतही नाही, अशी उपरोधिक टीकाही जरांगेंनी केली.

तिसरी आघाडी असू शकते का? याबाबत जरांगे यांना विचारले असता ते म्हणाले, तिसरी आघाडी नाही, पण, पुन्हा एक बैठक होऊ शकते. कोण कोण एकत्र येतंय? समीकरणे कशी जुळत आहे. याबाबत एक बैठक होईल, असं जरांगे म्हणाले.

आव्हाडांची राज ठाकरेंवर टीका
आव्हाड म्हणाले की, आरक्षण कशासाठी आहे, हे समजून घ्यावे लागतं. एसी वातावरणात, एसीच्या घरात जन्माला आलेल्या लोकांना आरक्षणाचे महत्त्व काय समजणार? आरक्षणाचे महत्त्व समजण्यासाठी त्या परिस्थितीतून जावे लागते. ज्यांचे चारही हात तुपात आहेत आणि डोके कढईत त्यांना काय आरक्षण कळणार ?, असा खोचक टोला आव्हाडांनी राज ठाकरेंना लगावला.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप