विश्वजीत कदम यांनी केली सतीश तांब्याची पोलखोल, एबी फॉर्म कोरा दिला होता असे केले स्पष्ट
कोल्हापूर, २० जानेवारी २०२३: काँग्रेस पक्षाने डावले असा आरोप काँग्रेसचे निलंबित युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केलेला असताना त्यांचाच जवळचा मित्र असलेल्या विश्वजीत कदम यांनी तांबे यांच्या दाव्याची पोलखोल केली आहे. नाशिक पदवीधर विधान परिषद मतदार संघाच्या उमेदवारीचा एबी फॉर्म तांबे कुटुंबीयांना कोरा दिला होता. त्यावर कोणाचे नाव लिहिलेले नव्हते. त्यामुळे सुधीर तांबे की सत्यजित तांबे हा निर्णय त्यांच्या कुटुंबाने घ्यायचा होता. मात्र तसे न करता तांबे आणि अपक्ष फॉर्म भरल्याने विश्वही कदम यांनी त्यांच्यावर टीका केली
कोल्हापूरात सतेज पाटील यांच्यासह पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
पत्रकार परिषदेत नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये घडलेल्या राजकिय घडामोडींवर प्रश्न विचारल्यावर बोलताना ते म्हणाले, “कॉंग्रेस पक्षाने सत्यजित तांबे यांना कधीच डावलल नाही. पक्षाने तांबे कुटुंबाला कोरा एबी फॉर्म दिला होता. कोणी उमेदवारी घ्यायची याचा निर्णय तांबे कुटुंबियांनी घ्यायचा होता. मग सत्यजित तांबे यांना डावल असे कसे म्हणता येईल.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “वरिष्ठांनी तांबेंच्या बाबती जो निर्णय घेतला आहे तो वरिष्ठांनी घेतला आहे. माध्यमात भाजपप्रवेशाबाबत चाललेल्या चर्चा निरर्थक आहेत. तरीही महाराष्ट्राचे राजकीय संस्कृती आम्ही पहील्यापासून पाहतोय. राजकिय मतभेद असले तरी विरोधी नेता आला तर नमस्कार करायचा नाही का? माझी माध्यमांना विनंती आहे कि, या चर्चांना इथेच पुर्ण विराम द्यावा.” असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.