८ लाख शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण – सहकार मंत्री अतुल सावे

मुंबई, 20 ऑक्टोबर 2022: योजनेचा लाभ देण्यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या आधारक्रमांकाचे प्रमाणीकरण करण्यात आले असून सध्या सुमारे ८ लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. त्यापैकी ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आज थेट रक्कम जमा करण्यात आल्याचे सहकार मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.


महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतून अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देणाऱ्या योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमास सहकार मंत्री अतुल सावेमहसूलमंत्री राधाकृष्ण विखे – पाटीलग्रामविकास मंत्री गिरीष महाजनकृषीमंत्री अब्दुल सत्तारबंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसेउद्योगमंत्री उदय सामंतउत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईआरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंतशिक्षण मंत्री दीपक केसरकरमुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व जिल्हाधिकारीलाभार्थी शेतकरी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.


सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी प्रास्ताविक केले. कर सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी आभार मानले.