केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत

पुणे, 18 फेब्रुवारी 2023-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सीमा सुरक्षा दलाच्या विशेष विमानाने लोहगाव विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आमदार चंद्रशेखर बावनकुळे होते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री.शाह यांचे स्वागत केले.

यावेळी खासदार प्रकाश जावडेकर, आमदार माधुरी मिसाळ, माजी मंत्री पंकजा मुंडे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, सीआरपीएफचे सहायक कमांडट सुबोध कुमार आदी उपस्थित होते.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप