राज ठाकरेंच्या सभेत उद्धव आणि अजित पवारांचा प्रहार

रत्नागिरी, ६ मे २०२३ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज रत्नागिरी येथे सभा झाली या सभेत त्यांनी शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या कडाडून टीका करताना मुंबईचा महापौर बंगला लोकांना विचारून ढापला का असा थेट सवाल करत हल्लाबोल केला तर दुसरीकडे अजित पवार यांना घाबरूनच शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला असेल असा सणसणीत टोला देखील लगावला.
राज ठाकरे म्हणाले, आज पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष बारसूला येऊन गेले. इकडे येऊन काय म्हणाले? जी लोकांची भावना आहे ती आमची भावना आहे. मग मुंबईचा महापौर बंगला हा काय लोकांना विचारुन ढापलात का? असा थेट प्रश्न राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना उद्देशून विचारला आहे. राज ठाकरे यांची आज रत्नागिरीमध्ये सभा झाली. त्या सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना हा थेट सवाल केला आहे. इतकंच नाही तर कोकणच्या सगळ्या बांधवांना सावध रहा अशीही विनंती केली आहे.

माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. सगळ्या कोकणवासियांना माझी ही विनंती आहे की हात जमीन घ्यायला कुणी आला तर त्याला विचारा की तुला कशाला ही जमीन हवी आहे? हीच जमीन तुम्हाला उद्या पैसे देईल. आत्तापर्यंत जे व्यापारी लोकप्रतिनिधी निवडून देत आलात ना? त्यांना जरा घरी बसवा. त्यांना सांगा.. आम्हाला आजपर्यंत विकलंत त्यांना त्यांची जागा दाखवा.
पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष आज येऊन गेले. आता काय सांगत आहेत? जी लोकांची भावना असेल ती आमची भावना. अरे वा! मग तुम्हाला हवा होता म्हणून मुंबईत बाळासाहेबांच्या नावावर महापौर बंगला ढापलात तो लोकांना विचारुन ढापलात? आता तुमच्यासमोर येत आहेत तुमची भावना सांगत आहेत. त्याला काय अर्थ आहे? लोक जेव्हा तुम्हाला निवडून देतात त्यावेळी तुम्ही लोकांचं हित पाहिलंच पाहिजे.

जनतेचं हित कशात आहे? त्यांना घरदार सोडावं लागणार नाही ही काळजी सरकारने घ्यायची असते. आता हे काय सांगत आहेत तुमची भावना ती आमची भावना? बाबांनो हे सगळे फसवत आहेत. तुम्हाला मूर्ख बनवत आले आहेत हे सगळे आजपर्यंत. थोडा विचार करा या सगळ्या गोष्टींचा. हे सगळे कधी या प्रदेशाची धूळधाण करतील तुम्हाला कळणारही नाही. सगळ्यांचे काही ना काही तरी हेतू आहेत. व्यापारविषयक हेतू आहेत. या सगळ्या गोष्टींमधून आपलं कोकण वाचवा म्हणूनच मी रत्नागिरीत आलो. मी सांगितलेल्या गोष्टींबद्दल गांभीर्याने विचार करा असंही आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

अजित पवारांचे वागणे बघून राजीनामा मागे घेतला

यांनी देखील शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावर भाष्य केलं. राज ठाकरे आज सध्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. रत्नागिरीत त्यांची मोठी जाहीर सभा सुरू आहे. या सभेच्या सुरुवातीलाच त्यांनी पवारांच्या राजीनामा नाट्याचा उल्लेख केला. राज ठाकरे म्हणाले. मला असं वाटतं, शरद पवारांना खरंच राजीनामा द्यायचा होता. परंतु अजित पवार त्या दिवशी जे वागले ते पाहून शरद पवारांनी त्यांचा राजीनामा मागे घेतला.
राजीनामा दिला त्या दिवशी अजित पवार कार्यकर्त्यांशी कसे वागले ते आपण पाहिलं. ए तू गप्प बस, ए तू शांत बस, कार्यकर्त्यांच्या हातातला माईक घे, असं सगळं त्यांचं सुरू होतं. हे सगळं पवार साहेबांच्या डोळ्यादेखत सुरू होतं. हे सर्व पाहताना पवार साहेबांच्या मनात आलं असणार. अरे आत्ताच तर मी राजीनामा दिलाय आणि अजित पवार असा वागतोय. खरंच जर राजीनामा देऊन टाकला तर हा माणूस उद्या मला पण म्हणेल ए गप्प बस. त्या भितीपोटी, या भितीपाई त्यांनी राजीनामा मागे घेतला. जेणेकरून नंतर कसलीही भानगड नको.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप