उदय सामंत म्हणाले ‘…तर गप्प बसणार नाही’

मुंबई, ५ डिसेंबर २०२४: शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार की नाही? याबद्दल अजूनही स्पष्टत नाहीय. शपथविधी सोहळा आता काही तासांवर आलेला असताना एकनाथ शिंदे शपथ घेणार की नाही? याबद्दल स्पष्टता नाहीय. शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन पुढील तासाभरात निर्णय घेतला जाईल असं सांगितलं. उदय सामंत यांनी या पत्रकार परिषदेत महत्त्वाचे खुलासे केले. “कोणीही उपमुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक नाही. आमचे नेते एकनाथ शिंदे आहेत, ते उपमुख्यमंत्री होतील याची खात्री आहे. या सगळ्या गोष्टींना पूर्णविराम देण गरजेच आहे. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल नाही, तर आम्ही देखील आमच्या कोणावर ती जबाबदारी देण्याचा प्रयत्न केला, तरी ती स्वीकारणार नाही” असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

“मीडियामधून ज्या बातम्या येत आहेत, हा होणार का? तो होणार का? प्रश्नचिन्हाने या बातम्या येत आहेत, पण आम्ही कोणीही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाही. या सरकारमध्ये आमचे नेते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकरातील. महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणलेल्या ज्या योजना आहेत, त्याच्या कायस्वरुपी अंमलबजावणीसाठी देवेंद्र फडणवीस यांना सहकार्य करतील. एकत्र बसून महाराष्ट्राचे निर्णय होतील” असं उदय सामंत म्हणाले.

‘हे अत्यंत दुर्देवी आहे’

“आमच्यापैकी कोणाचेही नाव येऊ नये, ही प्रामणिक इच्छा आहे. आमच्यापैकी कोणाच्याही मनात खुर्चीवर कोणीतरी जाऊन बसावं असा उद्देश नाही. हे जाहीरपणे खुलासा करावा लागण हे अत्यंत दुर्देवी आहे. आम्ही एकनाथ शिंदे यांना नेता मानतो. आमचं राजकीय करियर त्यांच्या हाती दिलेलं आहे. त्यांना डावलून कोणी काही करत असेल तर गप्प बसणार नाही. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असावेत ही आमची कायमस्वरुपी भूमिका आहे” असं उदय सामंत म्हणाले.