हिंदू जनआक्रोश मोर्चात हजारो नागरिक सहभागी; लाल महाल ते डेक्कनपर्यंतचे वातावरण झाले भगवे 

पुणे, २२ जानेवारी २०२३: हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आज काढण्यात आलेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये हजारो नागरिक महिला लहान मुले सहभागी झाले गोहत्या बंदी धर्मांतर बंदी आणि लहुजी हा विरोधात हिंदू संघटना आज एक वाटल्या होत्या लाल महल ते डेक्कन जिमखाना येथील संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला भगव्या टोप्या, झेंडे यामुळे हा परिसर भगवामय झाला होता.

 

सकल हिंदू समाजच्या वतीने येत्या आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आमदार शिवेंद्र राजे भोसले, तेलंगणाचे आमदार राजा भैया, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, शिरीष मोरे, धनंजय देसाई यांचा विशेष सहभागी झाले होते. लाल महाल येथून मोर्चाची सुरूवात झाल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करण्यात आली. त्यावेळी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया… हिंदू धर्म की जय…. भारत माता की जय… धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय… अशा घोषणांनी परिसर दनानून सोडला होता.

 

त्यानंतर लक्ष्मी रस्त्याने हा मोर्चा डेक्कन परिसरातील संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पोहोचला. यामध्ये शहरातील राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळे या मोर्चात सहभागी झाले होते. त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले होते.

 

‘धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद यासाठी कडक कायदे करावेत व त्यांची कठोर अंमलबजावणी करावी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.