ज्या वाटेने शिंदे जाणार त्यावर काटे तर असणारच – बच्चू कडू यांचा सल्ला

मुंबई, ६ जुलै २०२३ : अजित पवार गट सत्तेत आल्याने शिंदे गटामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यात शिंदे गटातील काही आमदार हे मंत्रिपद मिळत नसल्याने उघड नाराजी व्यक्त करत आहेत. त्यात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी अजित पवारांना बरोबर घेण्याची काय गरज होती काय? असा सवाल उपस्थित केला आहे. आमदार आक्रमक झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. यावरून अपक्ष आमदार बच्चू कडूंनी शिंदेंच्या शिवसेनेला एक सल्ला दिला आहे.

भाजपने राष्ट्रवादीलासोबत घेतल्याने शिंदेंच्या आमदारांची गोची झाली आहे. ज्या शिंदेंनी या आरोपांवरून शिवसेनेमध्ये उठाव केला त्यांच्याच डोक्यात कुऱ्डाड मारण्याचा हा प्रकार आहे. त्यांचं आयुष्य जपणं हे भाजपच कर्तव्य आहे. मात्र आता यावरून शिंदेच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर असला तरी ती दाखवता येत नाही कारण आपलेच दात आणि आपलेच ओढ अशी परिस्थिती झाली आहे.

कारण मविआमध्ये राष्ट्रवादी शिवसेनेची काम होऊ देत नव्हती. तसेच ते त्यांच्या मतदारसंघात बांधणी करत होते. असा आरोप शिंदे गट करत होता. मात्र आता या आरोपांनाच छेद मिळाला आहे. अशी टीका अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. तर शिंदे गटाने आता ही भूमिका घेतली आहेच तर या वाटेवर हे काटे देखील त्यांना सहन करावेच लागणार आहेत. त्यांच्या नाराजीला अर्थ नाही. असं देखील यावेळी अपक्ष आमदार बच्चू कडू म्हणाले आहेत.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप