महाराष्ट्रातील कट्टर विरोधक नागालँडमध्ये भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्तेत
कोहीम, ८ मार्च २०२३ : महाराष्ट्रातील भाजपचे कट्टर विरोधक, प्रमुख विरोधीक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कडाडून टीका करत असतात. सोशल मीडियावर राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही भाजप समर्थकांवर तुटून पडलेले असतात मात्र
नागालँडमध्ये वेगळेच चित्र पाहायला मिळालेले आहे. भाजपने मागणी केलेली नसतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने येथील सह सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाप्रणित आघाडीला पाठिंबा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत कोहिमाममध्ये झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नागालँडमध्ये २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १२ जागांसाठी आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ७ जागांवर राष्ट्रवादीला विजय मिळाला.
राष्ट्रवादी काँग्रेसने या संदर्भात पत्रक काढले आहे यामध्ये,
४ मार्चला कोहिमा येथे झालेल्या बैठकीत विधिमंडळ पक्षनेते, उपनेते, प्रमुख प्रतोद आणि प्रवक्ते यांची निवड करण्यात आली. तसेच सरकारला पाठिंबा द्यायचा की विरोधी पक्षात राहून काम करायचं यावरही चर्चा झाली. यात नवनियुक्त आमदारांनी आणि स्थानिक पक्षनेत्यांनी राज्याच्या व्यापक हितासाठी मुख्यमंत्री एन. रिओ यांच्या नेतृत्वातील एनडीपीपी सरकारचा भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप