विरोधकांना राजकारण कशाचं कराव याचं भान नाही – मुरलीधर मोहोळ
पुणे, २७ सप्टेंबर २०२४: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (दि. २९) ऑनलाईन पद्धतीने मेट्रो उद्घाटन व विविध विकास कामांचा उद्घाटन व भूमिपूजन होणार आहे. पुण्याच गणेश कला क्रीडा मंच येथे हा कार्यक्रम ऑनलाइन बघितला जाणार असून, यावेळी देवेंद्र फडणवीस व अजित पवार, हे दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार आहेत. मेट्रो सेवा सुरु करावी यासाठी विरोधकांनी राजकारण सुरु करून त्यांना कशाचही बान नाही हेच दाखवून दिले आहे, अशी टीका केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.
पाऊस असल्याने कार्यक्रम रद्द केला. कार्यक्रम झाला असता तर वाहतूक प्रश्न वाढला असता, नागरिकांना त्रास झाला असता, नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी म्हणून कार्यक्रम रद्द केला असंही ते यावेळी म्हणाले. पुण्यात नवीन मेट्रो मार्गाला परवानगी मिळेल, मेट्रो जाळ वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे असं म्हणत राजकारण कशाच करावं हे विरोधकांना कळत नाही. त्यांच्या काळात विरोधकांनी काय केलं? असा प्रश्न उपस्थित करत पुणेकरांना सगळ समजत असही मोहळ यावेळी म्हणाले आहेत.
प्रत्येक टप्प्याला मोदी का असा प्रश्न विचारला जातोय. पण असंच मेट्रो जगात सुरू होते. निवडणुकीत काय होत हे लोकसभेला लोकांनी दाखवले आहे. किती तरी नेते कोरोना काळात दिसले नाहीत, पुणे मेट्रोला विरोध करणारे आता मेट्रो उद्घाटन करत आहेत असंही ते यावेळी म्हणाले. तसंच, सरकारी कार्यक्रम आहे. सुरक्षा महत्वाची आहे. खर्च होतो आणि झाला आहे. परंतु, निसर्गाबद्दल कुणाच्या काही हातात नाही. पावसाची शक्यता नसती तर कार्यक्रम झाला असता असंही मोहळ म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल मेट्रोच्या स्वारगेट ते मंडई या भुयारी मार्गाचे लोकार्पण होणार होतं. पंतप्रधान दुपारी ४ वाजता विमानतळावरून शिवाजीनगर मेट्रो स्थानकातून मेट्रोने स्वारगेटला जाणार होते. त्यानंतर ही मेट्रो प्रवाशांसाठी सुरु होणार होती. पावसामुळे पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नागरिकांना उदघाटन समारंभाला येणं शक्य होणार नाही. त्यामुळे उदघाटन समारंभ रद्द करण्यात आला.