कसब्यात काँग्रेसच्या पाच इच्छुकांची नावे जाणार हायकमांड कडे, संजय जगताप यांच्याकडे महत्वाची जबाबदारी
पुणे, २३ जानेवारी २०२३ : पुण्यात रिक्त झालेल्या विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पुण्याच्या माजी महापौर आणि भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोट निवडणूक होणार आहे.
दरम्यान कसबा पेठ पोटनिवडणूक काँग्रेस लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. उमेदवारांनी नावे ठरली असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ही नावे दिल्लीच हायकमांडला पाठवणार आहेत.
कसबा पेठ मतदार संघासाठी ५ नावे ठरले आहेत. कसबा पेठ विधानसभा हा काँग्रेससाठी पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे. दरम्यान संगीता तिवारी, बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे, अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आहेत. या उमेदवारांनी नाना पटोले यांनी भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. कसबा पेठ पोटनिवडणूकीसाठी आमदार संग्राम थोपटे यांची पक्षाच्या निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुक्ता टिळक यांच्यानिधनानंतर आज निवडणूक आयोगाने ही पोटनिवडणूक जाहीर केली आहे. मात्र ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक जाहीर होताच काँग्रेसने निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली. परपरांगत हा मतदारसंघ काँग्रेसच लढवत आला आहे.
मतदान कधी?या पोटनिवडणूकीसाठीची अधिसूचना ३१ जानेवारी रोजी जारी करण्यात येणार असून ७ फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे.८ फेब्रुवारी अर्जांची छाननी तर १० फेब्रुवारी पर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. या दोन्ही पोटनिवडणूकांसाठी मतदान २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि या निवडणूकीचा निकाल २ मार्च रोजी जाहीर होईल.