सोशल मीडियावर हिरो असणाऱ्या वसंत मोरेंचे डिपॉजिट जप्त

पुणे, ६ जून २०२४ : लोकसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांच्या टॅगलाईन प्रत्येकाच्या बोलण्यात होत्या. या टॅगलाईन कोणत्या तर, पुण्याची पसंत मोरे वसंत आणि काय म्हणतात पुणेकर निवडून येणार धंगेकर. परंतु, प्रत्यक्षात जेव्हा अंतिम निकाल आला त्यावेळी मतदारांनी या दोघांनाही सपशेल नाकारले आणि बाजी मारली ती भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी. त्यात वसंत मोरेंचा सोशल मीडियावर दबदबा त्यामुळे त्यांचा फॅन फॉलोअर मोरेंना भरभरून मतं देत तारून नेईल असा अंदाज होता. पण, प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील हिरो, वसंत मोरे पुण्याच्या मैदानावर झिरो ठरले असून, मोरेंचे डिपॉजिटही जप्त झाल्याने लाखो फॉलोवर्स गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वसंत मोरेंची सोशल मीडियावर प्रचंड म्हणजे प्रचंड क्रेझ. त्यांचा हातोडा प्रसिद्ध होता. त्यांची छोटी जरी पोस्ट पडली तरी, त्यावर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतो. एवढेच काय तर, ऐन लोकसभेच्या तोंडावर मोरेंनी मनसेला जय महाराष्ट्र केल्यावर लाखो यूजर्सने अक्षरक्षः कमेंटचा महापूर आणला होता. हे सर्व बघता मोरे लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मते आपल्याबाजूने वळवणार असा अंदाज बांधला जात होता. पण झाले त्याच्या उलटं. वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर पुणे लोकसभेची निवडणूक लढले. मात्र त्यांच्या हाती मोठ अपयश आले. त्यांना मिळालेल्या मतांमुळे ते साध त्यांचं डिपॉजिटदेखील वाचवू शकले नाही. त्यामुळे माझे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत असे सांगणाऱ्या मोरेंना त्यांच्या लाखो फॉलोअर्सचा लोकसभेत फायदा न झाल्याने सोशल मीडियात हिरो असणारे वसंत मोरे पुण्याच्या मैदानावर मात्र, झिरो ठरल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोरे आणि धंगेकरांच्या टॅगलाईन प्रत्येक सामान्यांच्या मुखी होत्या. त्यामुळे पुण्याचा निकाल धक्कादायक लागणार का? अशी शंका येऊ लागली होती. पण अंतिम निकालात ही शंका खोटी ठरली. पुणेकरांनी मोहोळांना तब्बल ५.८४ लाख देत दिल्लीत पाठवले. तर, कसबा विधानसभेच्या पोट निवडणुकीत जादूई निकालाने आमदार झालेल्या रवींद्र धंगेकरांना ४.६१ लाख मते मिळाली. तर वसंत मोरे यांना अवघे ३२ हजार मते मिळाली. मोरे यांचे फेसबूकवर ५ लाख ६८ हजार फॉलोवर्स आहेत, इंस्टाग्रामवर ३९ हजार ५०० तर एक्सवर ४७ हजार फॉलोवर्स आहेत. तरीही प्रत्यक्षात त्यांना मते खूप कमी पडले.