राऊत अन सामंतांचे परस्पर विरोधी दावे, नार्वेकरांच्या विजयात कोणाकोणाचा वाट

मुंबई, १३ जुलै २०२४: उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधान परिषदेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांच्या विजयाबद्दल अनेक दावे केले जात आहेत. संजय राऊत यांनी नार्वेकरांना काँग्रेसने मतदान केले असा दावा केला आहे. तर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अदृश्‍य शक्तीमुळे नार्वेकरांना २२ मते पडली, महाविकास आघाडीत खदखद होती असे असा दावा केला आहे. त्यामुळे नार्वेकरांच्या विजयात कोणाकोणाचा वाटा आहे असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवार (१२ जुलै) मतदान पार पडले. त्यामध्ये महायुतीचे सर्वच्या सर्व तर त्यानंतर, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकरही विजयी झाले. त्याबाबत शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. एक अदृश्य ताकद आहे. ज्यांनी मिलिंद नार्वेकर यांना सोळा वरून २२ वरती नेलं. म्हणून त्यांचा विधान परिषदेत असं उदय सामंत म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की, महाविकास आघाडीकडून कालपर्यंत भाजपवर छोट्या पक्षांना गिळंकृत केल्याचा आरोप केला जात होता. मात्र आज याच महाविकास आघाडीतील मोठ्या पक्षांनी कपिल पाटील त्याचबरोबर शेकापच्या जयंत पाटील यांचा काय केलं? हे महाराष्ट्रने बघितलं आहे. कारण उद्धव ठाकरे गटाकडे मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी १६ मतं होते. मात्र त्यांची पाच मत वाढली ही अदृश्य ताकद कोण आहे? असा सवाल सामन त्यांनी केला आहे.

एक अदृश्य ताकद अशी आहे की, ज्यांनी मिलिंद नार्वेकर यांना सोळावरून बावीस वरती नेलं. मिलिंद नार्वेकर हे २२ पर्यंत कसे गेले? ही आत्मचिंतनाची बाब मिलिंद नार्वेकर यांच्या मागे अदृश्य शक्ती होती. महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये किती खदखद होती. हे कालच्या निकालाने स्पष्ट झाला आहे. असं म्हणत सामंतानी महाविकास आघाडीमधील खदखदीवर टीका केली आहे.