ठाकरेंना फक्त हाताची सफाई माहिती आहे – मुख्यमंत्र्यांची टीका

नागपूर, ११/१२/२०२३: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुहू बिचवर ट्रॅक्टर चालवत असतानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी टीका करत बिचवर कोणी ट्रॅक्टर चालवत का? अशी खिल्ली उडवली होती. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी प्रत्त्‍युत्तर देत ते ट्रॅक्चर समुद्रातील कचरा सफाई करणारे होते. ठाकरेंना फक्त हात सफाई माहिती आहे, अशी टीका केली.

स्वच्छ, प्रदूषणमुक्त मुंबईसाठी महापालिकेच्या वतीनं स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुहू किनाऱ्यावरील स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता करणारा ट्रॅक्टर स्वत: चालवला आहे. यावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते आज विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई स्वच्छतेसाठी डीप क्लिन ड्राईव्ह योजना गरजेची आहे. ही माझी संकल्पना आहे. एकाच ठिकाणी चार-पाच वॉर्डचे लोक घ्यायचे. दोन-अडीच लोकांना घेऊन रस्ते स्वच्छ करायचे. फक्त रस्तेच नाही, गल्ल्या, नाले, सार्वजनिक स्वच्छतागृहे एकाच दिवशी स्वच्छ करायचे, अशी डीप क्लिन योजना आहे.
“मी चौपाटीवरही गेलो होतो. ते (आदित्य ठाकरे) माहिती घेऊन बोलले असते तर बरं झालं असतं. तो जो ट्रॅक्टर होता, त्यावर मागे क्लिनर आहे. तो पाठीमागून फिरतो. त्यात असलेले दगड, प्लास्टिक वेगळे केले जातात. फक्त रेती आणि वाळू मागे राहते. त्यांनी अर्धवट माहिती घेतली आहे”. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
“आम्ही रस्त्यांची सफाई करतो. समुद्राची सफाई करतो. त्यांनी हातची सफाई केली. तिजोरीची सफाई केली. आम्ही रस्ते धुतोय तेही त्यांना आवडत नाही. त्यांनी तिजोरी धुतली आणि आम्ही रस्ते धुतोय आता. येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना धुतल्याशिवाय राहणार नाही”, असा टोलाही त्यांनी लगावला.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप