तांबेंचा भाजपसोबत तूर्तास घरोबा नाही
नाशिक, २१ जानेवारी २०२३: काँग्रेसचेपरंपरागत घराणे म्हणून ओळख असलेल्या थोरात – तांबे यांचा नाशिक पदवीधर मतदारसंघात नोंदणी केलेल्या दोन लाख मतदारांवर भरवसा असल्याचे चित्र आहे. राज्यात राजकीय समीकरणाचे कडबोळे झालेले असताना कोणताही धोका नको म्हणून सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली.
भाजपच्या पाठिंब्यासाठी मागणी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले असले तरी अद्याप याबाबत भाजप अथवा तांबे यांच्याकडून कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. दरम्यान, सुमारे दोन लाख ७० हजार इतके मतदार असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात तांबे यांनी दोन लाखांच्या दरम्यान नोंदणी केली आहे.
डॉ. सुधीर तांबे या अगोदर काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीत सलग दोन वेळा विजयी झाले होते. या वेळी विविध संघटना, महाविद्यालये, शिक्षक संस्था आणि विद्यार्थी संघटनांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे या वेळीदेखील हे मतदार पाठिशी राहतील, असे सत्यजित तांबे यांनी सांगितले. सत्यजित तांबे यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. पण प्रदेशस्तरावरील प्रमुख नेत्यांनी डॉ. सुधीर तांबे यांनाच उमेदवारी द्यावी असा आग्रह पक्षश्रेष्ठीकडे केला. त्यानुसार सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर झाली. मात्र, त्यांनी उमेदवारी मविआला शेकापचा पाठिंबा विधान परिषदेच्या कोकण, नागपूर आणि औरंगाबाद येथील शिक्षक मतदारसंघातील, तसेच अमरावती, नाशिक येथील पदवीधर मतदारसंघातील आघाडीच्या सर्व उमेदवारांना शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. या पाच मतदारसंघांत येत्या ३० जानेवारीला निवडणूक होत आहे. या सर्वांच्या विजयाकरिता शेकाप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची शिकस्त करावी, असे निर्देश पक्षाचे सरचिटणीस आम जयंत पाटील यांनी दिले आहेत. दाखल न करता सत्यजित यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. या पक्षशिस्तभंगामुळे तांबे पितापुत्रावर निलंबनाची कारवाई झाली आहे. या सर्व घडामोडींवर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी अद्यापही मौन बाळगले असून त्यांच्या भूमिकेवर तांबे यांचे भवितव्य अवलंबून असल्याची चर्चा आहे.
तांबे पाटील विलासराव समर्थक
सत्यजित तांबे बाळासाहेब थोरात आणि शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील हे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक मानले जातात. कपिल पाटील यांनी जाहीर सभा घेत सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिल्याने आघाडीतील पक्षांनी फारकत घेतल्याचे स्पष्टआहे. तांबे यांची अपक्ष उमेदवारी, थोरात यांचे मौन आणि कपिल पाटील यांचा पाठिंबा याबाबत नगर जिल्ह्याच्या राजकारणात नवीन राजकीय समीकरणे अस्तित्वात येत आहेत.