अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांचे प्रश्न तातडीने सोडवा : विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी
मुंबई, दि. २८/०२/२०२३: राज्यात दोन लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका-मदतनीस कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या न्याय मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला बसल्या आहेत. या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या प्रश्नांना तातडीने न्याय देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी यापूर्वी हिवाळी अधिवेशनावेळी आंदोलन केले होते. त्यावेळी दि. 26 जानेवारी पर्यंत त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिलं होतं. मात्र अजूनही त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. कोरोना काळात चांगले काम केले आहे. अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य करुन त्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याची आग्रही मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप