सुप्रिया सुळे महिला आरक्षणाच्या विरोधात, आरक्षणाची गरज नसल्याचे वक्तव्य
नवी दिल्ली, २० सप्टेंबर २०२३ ः महिला आरक्षणाचं विधेयक लोकसभेत मंगळवारी मांडलं गेलं. या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरु आहे. यामध्ये सोनिया गांधींसह इतर महिला खासदारांनी महिला आरक्षणास पाठिंबा दिला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महिलांना आरक्षणाची गरज नाही अशी भूमिका घेतली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी जेव्हा संसदेत निवडून आले तेव्हा मला दोन महिला माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहतात त्या म्हणजे वृंदा करात आणि सुषमा स्वराज. या विधेयकाचा सरकारला फायदा होईल की तोटा ते माहित नाही पण हा या सरकारचा जुमला आहे. फार विचार करायची गरज नाही. कारण निवडणुकीच्या अनुषंगाने हे बिल मोदी सरकारने आणलं आहे.
मी लोकप्रतिनिधी आहे, माझ्यासारख्या महिलांनी आरक्षण घेऊ नये या मताची मी आहे. मी कसं काय आरक्षण घेणार? कारण हे आरक्षण ज्या महिलांना संधी मिळत नाही त्यांच्यासाठी आहे. माझ्यासारख्या महिलांनी हेच काय कुठलंही आरक्षण मग ते मराठा असेल, ओबीसींचं असेल, धनगर, मुस्लिम असेल कुठलंही आरक्षण घेऊ नये. कारण ज्याला आरक्षण खरोखर गरजेचं आहे त्याला त्याचा फायदा होईल. आम्हाला शिक्षण मिळालं आहे आमच्या कुटुंबाने आम्हाला आमच्या पायावर उभं केलं आहे. त्यामुळे आम्ही आरक्षण घ्यायला नको. महिला आरक्षणाी अमलबजावणी झाली पाहिजे तेव्हा त्यावर बोलता येईल. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळेंनी हे वक्तव्य केलं आहे.
कुठलंही जबाबदारीचं पद हे कर्तृत्वावर ठरतं. महिला किंवा पुरुष अशा निकषांवर ते ठरत नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ती व्यक्ती व्हावी जी महाराष्ट्राची प्रगती करु शकेल. असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप