सुनील टिंगरे यांच्या अडचणी वाढणार अग्रवाल च्या मुलाला मदत केल्याने संघटना आक्रमक
पुणे, २३ मे २०२४ : बांधकाम व्यवसाय अग्रवाल याच्या मुलाला येरवडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संरक्षण देण्याचा प्रयत्न आमदार सुनील टिंगरे यांनी केल्याने त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केलेली आहे. त्यामुळे आता पोलीस काय कार्यवाही करणार याकडे लक्ष लागलेले आहे.
कल्याणीनगर येथे पब मध्ये दारू पिल्यानंतर बांधकाम व्यवसायिक अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने पोर्शे ही आलिशान गाडी भरधाव वेगात चालून दुचाकीला धडक दिली. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रचंड संताप व्यक्त होत असताना त्यातील नागरिकांनी त्या अल्पवयीन आरोपीला मारहाण केली. दरम्यान त्याला येरवडा पोलीस ठाण्यामध्ये अल्पवयीन मुलाला आल्यानंतर आमदार सुनील टिंगरे यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्यावर कडक कारवाई केली जाऊ नये असा दबाव आणला असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. या संदर्भात टिंगरे यांनी खुलासा केला असून अगरवाल हे माझे मित्र आहेत त्यांच्या मुलाला पोलीस ठाण्यामध्ये नेले आहे अशी माहिती त्यांनी मला दिली. त्यामुळे मी चौकशीसाठी गेलेलो होतो मी कोणताही दबाव आणलेला नाही असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. मात्र त्यानंतरही त्यांच्यावर टीका सुरूच आहे. या प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलाला आता बालसुधाग्रहात टाकल्यानंतर विशाल अग्रवाल याला दोन दिवसाचे पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. त्यामुळे या प्रकरणावर चर्चा करायची शांत होत असतानाच आता मात्र टिंगरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष मुन्नावर कुरेशी यांनी यासंदर्भात पोलीस आयुक्तांकडे मागणी केलेली आहे.
ही घडलेली घटना अतिशय निंदनीय असून, त्यामध्ये पुण्यात काम करत असलेल्या दोन निष्पाप जिवांचा बळी गेला असून, पोलीसांनी केलेल्या तोकड्या कारवाईमुळे पोलीसांची भूमिका संशयास्पद व प्रतिमा मलीन झाली आहे. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या निष्पाप तरूण-तरूणीला न्याय देण्यासाठी आरोपीवर लावलेल्या भारतीय दंड संहिता मध्ये वाढ करावी, ज्या शोरूमच्या मालकाने गाडीचे रजिस्ट्रेशन न करता कार मालकाला दिली त्यालाही या गुन्हयामध्ये सहआरोपी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा. सरकारी कामात चुकीच्या पध्दतीने हस्तक्षेप करणाऱ्या व गुन्हा दाखल होवू नये म्हणून पोलीसांवर दबाव टाकणाऱ्या आमदार सुनिल टिंगरे याचेवर सरकारी कामात अडथळा आणल्याने ३५३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा. पुणे शहरात रात्री उशिरापर्यंत चालणारे सर्व हॉटेल्स, पब, यांचे परवाने (लायसन्स) तपासणी करून अवेळी चालणाऱ्या पब व हॉटेल्सवर कडक कारवाई करण्यात यावी. पुणे शहरातील सर्व प्रकारचे अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यात यावे. अन्यथा पक्षाच्या वतीने संपूर्ण पुणे शहरात तीव्र प्रकारचे आंदोलन छेडण्यात येईल. कळावे, असा इशारा वंचिततर्फे देण्यात आला आहे.