विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे यश, एमपीएससीच्या अभ्यासक्रमाची अंलबजावणी २०२५ पासूनच

पुणे, २३ फेब्रुवारी २०२३: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी 2023 आयोजित 2025 पासून करावी या मागणीसाठी पुण्यामध्ये विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन सुरू केलेले होते. पूर्वीचा निर्णय बदलणार नाही अशी भूमिका आयोगाने घेतलेली असताना अखेर विद्यार्थ्यांच्या मागणी पुढे आयोगाला झुकावे लागले आहे. आयोगाच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी 2025 पासून केली जाईल असे स्पष्ट केलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात बोलताना आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

एमपीएससी’ने नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी 2023 म्हणजे चालू वर्षापासून सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अचानक बदललेल्या अभ्यासक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याने याची अंमलबजावणी 2025 पासून केली जावी अशी मागणी अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांची आहे. या विरोधात यापूर्वी दोन वेळा आंदोलने झालेली असताना एमपीएससी निर्णय बदलले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आयोगाकडे या संदर्भात विनंती केली. त्यानंतर ही आयोगाची भूमिका ठाम आहे. आयोगाकडून निर्णय बदलला जात नसल्याने गेल्या दोन दिवसांपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांनी बालगंधर्व चौकात आमरण उपोषण सुरू केले आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी हजारो विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अचानक घटनास्थळी दाखल झाले. शरद पवार येणार याची माहिती विद्यार्थ्यांना लागतात चौकात प्रचंड गर्दी झाली.
शरद पवार यांनी ही बैठक घेतल्यानंतर मुंबईमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पवार आणि विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक होणार होती. मात्र मुख्यमंत्री, हे काल पहाटेपासून पुण्यामध्ये असून मुंबईत निर्णय होणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यातच वरिष्ठ पाचरून फिरलेल्या सूत्रामुळे आयोगाला त्यांची भूमिका बदलण्याची वेळ आलेली आहे. आयोगाने ट्विट करत 2023 पासून नव्या अभ्यासक्रमची अंबाजोई न करता 2025 पासून अंबानी केले जाईल असे स्पष्ट केलेले आहे आयोगाने हा निर्णय देताच बालगंधर्व चौकात विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.