वयाचे आणि अनुभवाचे भान ठेवून बोला – दादा भुसेंनी आदित्य ठाकरेंना सुनावले
मुंबई, २४ जुलै २०२३: शिवसेनेत फूट पाडून एकनाथ शिंदे भाजपसोबत गेल्यापासून आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नेहमीच टीका करताना दिसतात. आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या सरकारला नेहमी खोके आणि गद्दारांचे सरकार म्हणून लक्ष करत असतात. आता कला परवा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यालाच प्रति उत्तर म्हणून मंत्री दादा भुसेंनी आदित्य ठाकरेंना प्रत्येकाने वयाचे आणि अनुभव याचे भान ठेवले पाहिजे. बोलताना आपल्या वयाचे भान ठेऊन बोलावे असा टोला लगावला आहे.
आपण कोणा बद्दल बोलतोय याचे भान ठेवले पाहिजे. आपल्याला अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे. तुमचे अजून दुधाचे दात पडले नाहीत. यापुढे मुख्यमंत्र्यांनबद्दल बोलताना आपल्या मर्यादेचे भान ठेवावे असा इशारा यावेळी दादा भुसेंनी आदित्य ठाकरेंना दिला
यापूर्वी आदित्य ठाकरे म्हणाले होते, खोके सरकार फक्त घोषणांचे सरकार आहे. घोषणा दिल्या की, घटनाबाह्य मुख्यमंत्री आले असेच वाटते. सध्या साफ आणि स्वच्छ विरुद्ध गद्दारी असे राजकारण सुरु आहे. जगात महाराष्ट्राचं नाव होतं, तो महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे? राजकारणाची दलदल झाली असून आता कोण कोणाचे होर्डिंग्ज लावतो, कोण कोणाचे फोटो लावतो तेच समजत नाही.
आम्ही भोळे आहोत, उद्धव साहेब आम्हाला राजकारण कळत नाही. हा आमचा गुण आहे की अवगुण आहे? आम्हाला फोडाफोडीचं राजकारण जमत नाही, आम्ही जनतेचा आवाज ऐकतो, असेही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.