झोपी गेलेला आमदार जागा झाला, मनसेची आदित्य ठाकरेंवर टीका
मुंबई, १४ एप्रिल २०२३ : मुंबईतील वरळी बिडी चाळीच्या पुनविकासाचा प्रश्न रखडलेला असताना गेल्या तीन वर्षापासून येथील रहिवासी संक्रमण शिबिरात राहत आहेत. त्यांना हक्काचे घर कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर आदित्य ठाकरे यांनी निवेदन जाहीर करत पुढील तीन वर्षात नागरिकांना घरे मिळतील अशी आश्वासन दिले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी त्यास प्रत्युत्तर देत झोपी गेलेला आमदार जागा झाला अशी खोचक टीका केली आहे.
वरळीतल्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जाणार आहे. परंतु पुनर्विकास करत असताना रहिवाशांना ३ वर्षांपेक्षा जास्त काळ संक्रमण शिबीरात किंवा बाहेर भाड्याने घर घेऊन राहावं लागेल अशी भिती व्यक्त केली जात होती. याबाबत अलिकडेच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी येथील रहिवाशांची बैठक घेऊन त्यांचे प…