शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी घेतली गिरीश बापट जयकुमार गोरे यांची भेट

पुणे, २५ डिसेंबर २०२२ : भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.तर आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाल्याने शिवसेनेच्या उपनेत्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी बापट आणि गोरे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेऊन तब्येतेची विचारपूस केली यावेळी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. भट,शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे उपस्थित होते.

बापट साहेब कसे आहात, अस नीलम ताई म्हणताच ठीक आहे. बापट साहेब सभागृहातील अनेक सदस्य आपली आठवण काढत आहे.तुम्ही अधीवेशनात जे कामकाज केले ,व्यवस्था केला त्याबद्दल अनेकांनी आठवण काअधिवेशन होताच आपणास अनेक सदस्य भेटण्यास येणार आहे.आपण लवकर बरे व्हा,असे म्हणताच गिरीश बापट म्हणाले हो ताई, पण अधिवेशन कस चाललय आणि आणखी किती दिवस सुरू आहे.त्यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, सभागृह चांगल चाललय आणि ३० तारखेपर्यंत अधिवेशन चालेल,पण तुम्ही लवकर बरे व्हा व नागपूरला या अशा प्रकारे दोन नेत्यामध्ये चांगल्या प्रकारे संवाद झाला.

शक्यतो रात्रीचा प्रवास टाळला पाहिजे : नीलम गोऱ्हे

आमदार जयकुमार गोरे यांचा काल रात्री अपघात झाल्याची घटना घडली आहे.तसेच यापूर्वी देखील अनेक नेत्यांना अपघाताच्या घटनांना सामोरे जावे लागले आहे. त्या प्रश्नावर शिवसेनेच्या उपनेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, सध्या नागपूर पुणे किंवा नागपूर मुंबई या दरम्यान दिली जाणारी विमान सेवा 8 किंवा 9 वाजता आहे. ही विमाने रोजच ऊशीरा येतात . पुण्याबाहेर जाणारे आमदार व प्रवासी यांना त्यांच्या वेळा गैरसोयीच्या असून त्यामुळे प्रवास करताना अनेक अडचणींना नेत्यांना सामोरे जावे लागते. पण काही वर्षापूर्वी अधिवेशन झाल्यावर आमदारसाठी विशेष विमान सेवा दिली जात होती.मात्र आता अशा प्रकारची सेवा दिली जात नाही.त्यामुळे या प्रश्नावर केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरज आहे.तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागातील अधिकारी वर्गाने अपघात प्रवण क्षेत्र आहे. त्या ठिकाणाची पाहणी करण्याची गरज असून विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे.मला आठवते की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आम्हाला नेहमी सांगायचे की, तुम्ही रात्रीचा प्रवास करू नका.त्यामुळे शक्यतो ऊशीरा रात्रीचा प्रवास टाळला पाहिजे, असे आवाहन राज्यातील सर्व नेत्यांना त्यानी केले.