शिवसैनिकांनी आलेल्या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जावे : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे, ता. १८/०२/२०२३: शिवसेनेच्या सामाजिक कार्याच्या परंपरेमध्ये अनेक धार्मिक सण, उत्सवांचे महत्त्व मोठे आहे या माध्यमातून समाजाला सेवा देण्याची संधी शिवसैनिक सोडत नसतात.

या अनुषंगाने आलेल्या कोणत्याही परिस्थितीला त्यांनी खंबीरपणे सामोरे जावे, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे केले.

शिवसेनेचे पुणे उपशहरप्रमुख आनंद गोयल यांनी आज महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या खिचडी वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी फीत कापून केले. शिवसेना पुणे संपर्कप्रमुख आ. सचिन अहिर हे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

येरवडा परिसरातील पर्णकुटी परिसरातील राजीव गांधी हॉस्पिटल जवळ आज सकाळी हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी त्यांनी उपस्थितांना महाशिवरात्री निमित्त शुभेच्छा दिल्या आणि मार्गदर्शन केले.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, गटनेते पृथ्वीराज सुतार, महिला आघाडीच्या कविता आंब्रे आदी उपस्थित होते.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप