शेंबड्या पोराला ५० खोके एकदम ओके पाठ झालय – अजित पवार यांचा शिंदे गटाला टोला

सातारा, २९ मे २०२३: बारक्या शेंबड्या पोरालाही आता पन्नास खोके-एकदम ओके कळायला लागले आहे. तुमच्या येथे तर सायरन

वाजू लागला की लोकं म्हणतात ते बघा पन्नास खोकेवाला चाललाय, बैलपोळ्याला बैलाच्या अंगावरही ‘पन्नास खोके – एकदम ओके’ लिहले जात आहे. हे आम्ही सांगितले नव्हते, लोकांपर्यंतच ते पोचलेय’, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते विधी मंडळातील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर टीका केली.

 

पाटण मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज गुढे फाटा (ता. पाटण) येथील श्री गणेश मंगल कार्यालयात

झाला. मेळाव्यात अजित पवार यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे नाव न

घेता भाषणात अप्रत्यक्षपणे अनेक टोले

लगावले. ते म्हणाले, “हिंदूहृदयसम्राट

बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला न्याय व आधार देण्यासाठी शिवसेना उभी केली, वाढविली. साधे कार्यकर्ते मोठे केले. मात्र जे त्यांच्या जिवावर मोठे झाले, त्यांनीच त्यांच्या

मुलाकडील शिवसेना काढून घेतली, असा काय चमत्कार तिथे झाला की आमदार, खासदारांना जावे लागले. अशी गद्दारी फार काळ चालत नाही. आगामी निवडणुकीत ज्या पद्धतीने जागा

वाटप होईल तसे तुम्हाला काम करावेच लागेल, ” असेही ते म्हणाले.

 

दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व नाकारून शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी केली. ते सर्वजण एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले आणि पुढे भाजप सोबत त्यांनी सत्ता स्थापन केलेली आहे. शिंदे गटाच्या प्रत्येक आमदारास भाजपने ५० खोके दिले असल्याचा आरोप या काळात झाला. त्यावरून ५० खोके एकदम ओके अशी घोषणा लोकप्रिय झाली असून सार्वजनिक कार्यक्रम, विधिमंडळातील अधिवेशन सर्वच ठिकाणी ही घोषणा दिली जात आहे सोशल मीडियावर देखील या घोषणेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्याला अनुसरूनच अजित पवारांनी हे वक्तव्य केले.