शरद पवारांनी घेतला राजीनामा मागे
मुंबई, ५ मे २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याची स्वत:च घोषणा केली. त्यामुळे राजीनामा नाट्यास पूर्ण विराम लागला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी समितीची घोषणा केली. यानंतर आज (५ मे) या समितीने बैठक घेत शरद पवारांचा राजीनामा फेटाळला. तसेच पवारांनीच पक्षाचं अध्यक्ष रहावं असा एकमताने ठराव मंजूर केला. या बैठकीनंतर समितीतील नेत्यांनी शरद पवारांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली. तसेच समितीचा निर्णय कळवला. यावेळी त्यांनी ठरावावर विचार करण्यासाठी मला थोडा वेळ द्या, असंही त्यांनी सांगितलं. “शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांना यावर विचार करण्यासाठी थोडा वेळ देणं आवश्यक आहे. आम्हाला शरद पवार यांच्याकडून त्यांचा निर्णय कळाला की, याबाबतची माहिती आम्ही नक्की देऊ,” अस प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले होते.
शरद पवारांनी संध्याकाळी पत्रकार परिषद घेत मी अध्यक्षपदाच्या राजीनामा मागे घेत आहे. पक्षांमध्ये नव्या नेतृत्व निर्माण व्हावे यामुळे हा निर्णय जाहीर केला होता. मात्र, समितीचा निर्णय मला मान्य आहे त्यामुळे हा निर्णय मागे घेत आहे असे सांगितले. पवार यांनी हा निर्णय जाहीर करतात मुंबईतील वाय बी सेंटरच्या बाहेर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप