“शरद पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष होण्याची शक्यता”
पुणे, ४ एप्रिल २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आता त्यावर विचार करण्यासाठी समिती नेमली आहे. ही समिती देईल तो निर्णय मान्य आहे अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे. त्यामुळे पवार पुन्हा अध्यक्ष बनण्याची शक्यता निर्माण झाली असून, पवार समर्थकांनीही तशीच मागणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा अध्यक्ष ताई, दादा नाही तर पुन्हा साहेब अशीच अवस्था होण्याची शक्यता आहे.
लोक माझे संगती शरद पवार यांच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात पवार यांनी ते राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष राजीनामा देत असल्याचे जाहीर करून टाकले. यानंतर देशभरातील राजकारणात एकच उडाली आणि शरद पवार निवृत्त होणार अशा अफवांना सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्ते यामुळे अस्वस्थ झाले.
अनेकांना अश्रू रोखता आले नाहीत. त्या सर्व गोंधळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुप्रिया सुळे किंवा अजित पवार हे दोघे असतील अशी चर्चा सुरू झालेली असताना अनेक वरिष्ठ नेत्यांनी मात्र शरद पवार हेच अध्यक्ष असले पाहिजेत तुम्ही राजीनामा देण्याची गरज नाही असे सांगितले. तरीही पवार हे त्यांचे म्हणणे ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते अखेर यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांची एक समिती गठित केलेली असून ही समिती राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण असेल हे स्पष्ट करणार आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या समितीचा अहवाल का येणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे. त्यातच शरद पवार यांनी बुधवारी समिती जवळ निर्णय देईल तो आपल्याला मान्य असेल असे जाहीर केले. त्यामुळे समितीने शरद पवार हेच अध्यक्ष असले पाहिजे असा निर्णय घेतल्यास शरद पवारांचा राजीनामा हे पहिल्यातील वादळ ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
पवार यांचे निकटवर्तीय आणि पुणे महापालिकेचे माझे महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी यासंदर्भात पवार हेच अध्यक्ष असले पाहिजेत अशी भूमिका मांडत त्यांची निवेदन सादर केलेली आहे. त्यामुळे दादांना ताई साहेब हेच अध्यक्ष अशी अवस्था होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
अंकुश काकडे म्हणाले, पवार साहेबांचा निवृतीचा चेंडू आता समितीच्या हातात.
आदरणीय पवार साहेबांनी दोन दिवसापूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला, या निर्णयापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून, पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी देखील गळ घातली, परंतु दोन दिवस पवार साहेबांनी त्याला दाद दिली नाही. काल मात्र त्यांनी या बाबतीमध्ये त्यांनी नेमलेली समिती जो निर्णय देईल तो मान्य करेन, असे सांगितले ही अतिशय स्वागताची आणि आनंदाची बाब आहे. आता या सर्व प्रकरणाचा चेंडू साहेबांनी नेमलेल्या समितीच्या हातात आहे.
समितीच्या सर्व सदस्यांनी त्याच दिवशी साहेबांना आपला निर्णय मागे घ्या अशी विनंती केली होती, किंबहुना छगन भुजबळ यांनी ती समिती वगैरे काही नाही असे सांगितले होते, त्यामुळे समितीने त्वरित निर्णय घ्यावा. पुन्हा आमचे साहेब पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बसलेले आम्हाला दिसतील.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप