मुंबईमध्ये शरद पवार अजित पवारांचे स्वतंत्र शक्ती प्रदर्शन, अजित पवारांची आज सत्वपरीक्षा

मुंबई, ५ जुलै २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांसह नऊ प्रमुख नेत्यांनी बंड करून स्वतःचा वेगळा गट स्थापन केला आहे. त्या विरोधात आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्हिप बजावून आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी देखील त्यांच्या गटाची बैठक बोलावलेली आहे. शरद पवार यांच्या बैठकीला किती आमदार उपस्थित राहतात यावरून अजित पवार यांचे बंडे यशस्वी ठरणार की अपयशी ठरणार हे निश्चित होणार आहे. त्यामुळे आज अजित पवार यांची सत्वपरीक्षा असल्याचे समोर आले आहे. मात्र यावेळी राष्ट्रवादीतील या दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले जात आहे.

राज्याच्या राजकारणात प्रचंड मोठे फळभाज्या घटना घडलेली असून भाजपचा कट्टर विरोधक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाहिले जात असताना आज विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासह 30 आमदार शिंदे फडणवीस युती सरकारमध्ये सहभागी झाले आहेत.

गेल्या काही काळापासून अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ होते. त्यांना पक्षाचे प्रमुख केले जातील अशी शक्यता असताना मात्र तेथे सुप्रिया सुळे यांची वर्णी लावण्यात आलेली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी मला विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारी मुक्त करा अशी मागणी पक्षाच्या बैठकीत केलेली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही अलबेला नसल्याची माहिती समोर येत असताना अजित पवार यांनी गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये भाजप नेत्यांची भेट घेतली. त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले होते. आज सकाळी अजित पवार हे मुंबईत बैठक घ्या असल्याने त्यांच्या गटातील आमदारांना मुंबई बोलण्यात आलेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एवढी मोठी खळबळ सुरू असताना यापासून सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे अनभिज्ञ असल्याचे दाखविण्यात आले.

गेल्या दोन दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसने कोणाची यावर चर्चा होत असताना आज मुंबईमध्ये शरद पवार आणि अजित पवार हे स्वतंत्र बैठका घेत आहेत. शरद पवार यांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होत आहे. तर अजित पवार यांची बैठक एम ए टी कॉलेज येथे होत आहे. दोन्ही गटांकडून आमदारांसह खासदार, शहराध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष या इतर पदाधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्यासाठी फोन केलेले आहेत. सध्या अजित पवार यांच्यासोबत चाळीस आमदार असल्याचे सांगितले जात असून पवार यांच्याकडे 13 आमदार आहेत. अजित पवार यांना जर पक्ष ताब्यात घेत असेल तर त्यांच्याकडे 37 पेक्षा जास्त आमदार उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन तासात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष असून अजित पवारांचे हे बंड फसले तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई निश्चित होणार हे स्पष्ट झालेले आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप