ओबीसींचे ताट वेगळे असावे, मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या: प्रकाश आंबेडकर
जालना , २० जून २०२४: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणासाठी आणि मराठा आरक्षणा विरोधात उपोषणाला बसलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची आंदोलन स्थळी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं जाऊ नये. ओबीसीच आरक्षणाचं ताट हे वेगळच असलं पाहिजे. अशी भूमिका स्पष्ट केली. तसेच लक्ष्मण हाके यांना उपोषण सोडण्यासाठी समजावून सांगितलं पाणी पिण्याचा आग्रह केला. मात्र हाके त्यांच्या आंदोलनावर कायम आहेत.
दरम्यान या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले की, उपोषण चालू राहिले तरी देखील हाके यांनी पाणी पिले पाहिजे. आरक्षणामुळे समाजात तेढ निर्माण होता कामा नये. महाराष्ट्रमध्ये सामाजिक सलोखा राहिला पाहिजे. मात्र यासाठी शासनाकडून कुठले पाऊल पडताना दिसत नाहीत. तर ओबीसी आणि मराठा समाज अनेक वेळा आमने सामने आलेला आहे. त्यामुळे ही परिस्थिती स्फोटक असल्याची जाणीव शासनाला मी अनेक वेळा करून दिलेली आहे. याबाबत शासनाने चर्चा केली पाहिजे. त्यातून मार्ग काढला पाहिजे. अशी मागणी आंबेडकरांनी केली.
पुढे ते असं देखील म्हणाले की, एखादी व्यवस्था सेटल झालेली आहे. शाश्वत झालेली आहे. त्याच्यामध्ये कोणालातरी घुसडण्याचा प्रयत्न केला. तर मग सामाजिक दृष्टीने असणारे सलोखा बिघडला जातो. त्यामुळे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं जाऊ नये. ओबीसीच आरक्षणाचं ताट हे वेगळच असलं पाहिजे. दोघांना एकमेकांसमोर भिडवत राहणं आणि विधानसभेपर्यंत हे भिडवत राहतील. अशी माझी धारणा आहे. असं म्हणत आंबेडकरांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सरकारवर निशाणा साधला आहे.
त्याचबरोबर सरकारने जरांगेंशी बोलत असताना सुद्धा सगे सोयरे शब्द जे ते म्हणत होते. त्याची व्याख्या करून घेतली पाहिजे किंवा कोणाला तरी करून द्यायला पाहिजे. जोपर्यंत व्याख्या काय होते त्यातले नेमकं काय ते कळत नाही. असा सल्ला देखील यावेळी आंबेडरांनी दिला आहे.