शिंदे गटाच्या सरवणकर यांना सिद्धिविनायक पावला, अध्यक्षपदी झाली नियुक्ती
मुंबई, ७ नोव्हेंबर २०२३ : शिवसेना आमदार सदा सरवणकर यांची श्री सिद्धीविनायक गणपती मंदीर विश्वस्थ व्यवस्था, व्यवस्थापन समितीचे (न्यास) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांची २३ जुलै २०२३ रोजी मुदत संपुष्टात आली आहे. त्यानंतर शिंदे सरकराने सरवणकर यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती केली आहे. याबाबतचे राजपत्र जारी करत हा निर्णय जाहीर केला.
सदा सरवणकर हे दादर-माहिमचे शिवसेनेचे आमदार आहेत. गत जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर सोबत येणारे मुंबईतील पहिले आमदार म्हणून सरवणकर यांना ओळखले जाते. त्यानंतर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागले अशी चर्चा होती. मात्र त्यांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवण्यात आले. त्यानंतर आता शिंदे यांनी सरवणकर यांची श्री. सिद्धीविनायक गणपती मंदीर न्यासचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. या पदाला राज्य शासनाने राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला आहे.
गतवर्षी गणेशोत्सवात प्रभादेवीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे विरुद्ध शिंदे गटात जोरदार राडा झाला होता. त्या राड्यात हवेत गोळीबार केल्याप्रकरणी सदा सरवणकर अडचणीत आले होते. याप्रकरणी चौकशी झाल्यानंतर सदा सरवणकरांना क्लिन चीट देण्यात आली होती.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप