संतोष डावरे यांची केंद्रीय सतर्कता आयोगावर संचालकपदावर नियुक्ती
पुणे, दि ०९/१०/२०२३: भारतीय लेखा तथा लेखा परीक्षा सेवेतील २००८ च्या तुकडीतील प्रशासकीय अधिकारी संतोष डावरे यांची संचालक केंद्रीय सतर्कता आयोग (central vigilance commission)दिल्ली या अत्यंत प्रतिष्ठेच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर नियुक्ती ही त्यांच्या प्रशासकीय कामाचा सन्मान समजला जात आहे .
संतोष डावरे हे मुळचे पुणे येथील अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर असुन त्यांची २००८ मध्ये युपीएससी परीक्षेतुन निवड झाली आहे .त्यांनी विविध विभागांतर्गत अनेक महत्त्वाच्या पदांवर कर्तव्यदक्ष पणे काम केले आहे. विशेष बाब म्हणजे संयुक्त राष्ट्राचे निधीचे आणि भारतीय राजदुतालय यांचे लेखापरीक्षण करण्याकरिता त्यांनी महत्त्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.
देशातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक प्रकल्पावरही काम करुन त्यांनी आपल्या कार्याचा व कामकाजाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे .त्यामुळेच केंद्रीय सतर्कता आयोगावर त्यांची नियुक्ती झाल्याचे समजले जाते .