संजय राऊत निर्बुद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका

पुणे, २१ फेब्रुवारी २०२३ : राज्यातील सत्ता गेल्यानंतर आणि निवडणुक आयोगाने निर्णय दिल्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत काहीही बोलू लागले आहेत. राजकारणात खाली वर होत असते, इतके निराश होऊन चालत नाही. संजय राऊत तर निर्बुद्धपणे बोलत आहेत, अशा निर्बुद्ध लोकांना मी उत्तरे देत नाही. उद्धव ठाकरे यांची एक २० – २५ शब्दांची डायरी आहे, तेच शब्द ते फिरवून फिरवून बोलतात, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका केली.

कसबापेठ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी भाजपच्या माजी नगरसेवकांसह आजी माजी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीपूर्वी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) नवीन अभ्यासक्रमाविरोधात विद्यार्थ्यांमध्यो मोठ्या प्रमाणात रोष आहे. त्यामुळे नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याची विनंती राज्य सरकारने एमपीएससीला केली आहे. मात्र एमपीएससी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसते. एमपीएससीने निर्णयाचा पुनर्विचार न केल्यास‌ राज्य सरकार त्या विरोधान न्यायालयात‌ जाणार आहे.

कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीत भाजप उमेदवारांसाठी चांगली परिस्थिती आहे. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. मात्र, कोणतीही निवडणूक गांभीर्याने घ्यायची असते, त्यामुळे आम्ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. आम्हाला लोकांचा आशीर्वाद मिळेल. कोणीही आले तरी आमच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे, असे सर्वजणच म्हणतात. महाविकास आघाडीचे नते जसा‌दावा करतात, तसा आम्ही करू शकतो. निवडणुकांमध्ये असे बोलावेत लागते, असेही फडणवूस म्हणाले.

मुंबईत अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री असे पोस्टर लावल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, त्या पोस्टरवर भावी म्हटले ना ! त्यामुळे कधीतरी जेव्हा त्यांचे राज्य येईल. तेव्हा ते मुख्यमंत्री होतील. मात्र मुख्यमंत्रीपदाची लढाई आतापासूनच का ?

विधान परिषदेच्या बारा आमदारांच्या नियुक्तीवरून उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून धमकावल्याचा आरोप माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केल्याच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, कोश्यारी जे बोलले ते खरं आहे. मला जी माहिती आहे त्यानुसार ज्यावेळी तिन्ही पक्षाचे नेते राज्यपालांना भेटायला गेले होते, तेव्हा राज्यपालांनी त्यांना सांगितलं होते की धमकीच्या पत्रावर राज्यपाल कधीच कारवाई करत नाही. योग्य प्रकारे पत्र पाठवा पण तिथे इगोचा मुद्दा निर्माण झाला.

चिंचवडमध्ये अपक्ष राहुल कलाटे‌ यांना पाठींबा देवून वंचितचे प्रकाश आंबेडकर मविआची कोंडी करत आहेत? आय प्रश्नावर फडणवीस म्हणाले, चिंचवड येथे शिवसेनेचा उमेदवार नाही. तेथे राष्ट्रवादीचा उमेदवार आहे. आंबेडकर यांनी पूर्वीज जाहीर केले आहे, आमची युती शिवसेनेशी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीशी नाही, त्यामुळे ते मविआची कोंडी‌ करतात, असे म्हणता‌ येणार नाही.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप